शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
4
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
5
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
6
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
7
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
8
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
9
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
10
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
11
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
12
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
13
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
14
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
15
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
16
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
17
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
18
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
19
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज

Kolhapur: शिरोलीच्या व्यावसायिकावर ‘हनी ट्रॅप’; ५८ लाखांचा गंडा, निवृत्त पोलिस उपनिरीक्षक, महिलेसह ९ जणांवर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 15:39 IST

तिघांना जामीन

कोल्हापूर : प्रेमाच्या जाळ्यात ओढून जवळीकता साधल्याचे फोटो आणि व्हिडीओची भीती घालत महिलेसह नऊ जणांनी व्यावसायिकास ५८ लाख ५४ हजार रुपयांचा गंडा घातला. हा प्रकार २०१८ ते मे २०२५ दरम्यान घडला. याबाबत व्यावसायिक फारुक महम्मद येळापुरे (वय ३३, रा. शिरोली पुलाची, ता. हातकणंगले) यांनी शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी महिलेसह नऊ जणांवर गुन्हा दाखल केला.रोजिना अल्लाबक्ष मुल्लाणी, अल्लाबक्ष कासीम मुल्लाणी (दोघे रा. शिरोली एमआयडीसी, कोल्हापूर), मुस्ताक अजीज मुल्ला (रा. पापाची तिकटी, कोल्हापूर), दस्तगीर इस्माईल मुजावर, जमीर दस्तगीर मुजावर (दोघे रा. विशाळगड, ता. शाहूवाडी), जमाल मौलासाहेब येळापुरे (रा. शिरोली एमआयडीसी) यांच्यासह स्वयंसेवी संस्थेचा पदाधिकारी भरतकुमार ढंग, एका राजकीय पक्षाचा पदाधिकारी अनिल माळवी आणि निवृत्त पोलिस उपनिरीक्षक आप्पासाहेब कोकितकर यांच्यावर गुन्हा दाखल झाला.येळापुरे यांच्याकडे कामाला असलेला अल्लाबक्ष मुल्लाणी याच्या पत्नीने प्रेमाच्या जाळ्यात ओढून मोबाइलमध्ये दोघांचे काही फोटो आणि व्हिडीओ काढले. हे फोटो नातेवाइकांना दाखवून बदनामी करू, अशी भीती घालून पैसे उकळले. हा प्रकार तिचा पती, वडील आणि इतर नातेवाइकांना समजला. त्यांनीही पोलिसांत तक्रार देण्याची भीती घालून पैसे उकळले. सात वर्षांत तब्बल ५८ लाख ५४ हजार लुबाडूनही ते पैशांची मागणी करीत असल्याने अखेर पोलिसांत फिर्याद दिल्याचे येळापुरे यांनी सांगितले.या गुन्ह्यातील महिलेसह मुस्ताक मुल्ला आणि दस्तगीर मुजावर यांना जामीन मंजूर झाला आहे. इतरांना अद्याप अटक झालेली नाही.