शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
2
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
3
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
4
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
5
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
6
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
7
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
8
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
9
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
10
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची क्रेझ! प्रदर्शनाआधीच हजारो तिकिटांची विक्री; वाचा रिपोर्ट
11
कंपन्या AI साठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... 
12
तिसऱ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; पाहा किती Shares मिळणार? डिविडंडचीही घोषणा
13
‘शिवाजी कोण होता?’ वाचनावरून तणाव; पोलिसांनी आंदोलन चिरडल्याचा आरोप
14
Harsha Richhariya : "एकही आरोप सिद्ध झाला तर सर्व संपत्ती..."; हर्षा रिछारियाचं सडेतोड उत्तर, दिलं थेट आव्हान
15
“अरविंद केजरीवाल कार्यालयात महात्मा गांधींची प्रतिमा का लावत नाहीत”; काँग्रेसचा थेट सवाल
16
"माझी मुलं श्रेयस अय्यरला हाक मारताना..."; प्रिती झिंटाने IPLच्या 'सरपंच'बद्दल केला खुलासा
17
रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा
18
रशियाने दिलेला शब्द पाळला! चौथी S-400 प्रणाली भारतात दाखल; आता शत्रूचे विमान हवेतच भस्म होणार
19
१५ ऑगस्टपर्यंत रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्याची संधी; सरनाईक यांनी दिली १०० दिवसांची सवलत
20
चेअर कार, स्लीपर, मेट्रो झाली, आता वंदे भारत कार्गो येणार, मालवाहतूक क्षमता अन् वेग किती?
Daily Top 2Weekly Top 5

नवख्यांची लढतच ठरणार लक्षणीय....

By admin | Updated: August 28, 2015 00:54 IST

महिला आघाडीच्या माध्यमातून त्यांनी महिलांच्या कला-गुणांसह त्यांना रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला आहे, तर

प्रदीप शिंदे- कोल्हापूरविक्रमनगर प्रभाग क्रमांक २२ हा अनुसूचित जाती महिलांसाठी आरक्षित आहे. बदलेल्या प्रभाग रचनेमुळे विक्रमनगर व टेंबलाई मंदिर परिसर या दोन प्रभागांतील काही भाग एकत्र करून हा एक भाग करण्यात आले आहे. सध्या या प्रभागातून इच्छुकांची यादी वाढत जरी असली तरी नवख्याच उमेदवारांमध्ये लक्ष्यवेधी निवडणूक होणार असल्याचे चित्र या प्रभागातून पाहण्यास मिळत आहे. सध्याचा विक्रमनगर प्रभाग हा ‘कष्टकरी व मध्यमवर्गीयांचा प्रभाग’ म्हणून ओळखला जातो. दरवेळीच्या निवडणुकीत या ठिकाणी अपुरा पाणीपुरवठा हाच प्रचाराचा मुद्दा असतो. दरवर्षी उमेदवार निवडून येतात. मात्र, पाण्याचा प्रश्न आजपर्यंत कोणी सोडविला नसल्याची ओरड स्थानिक नागरिकांतून होत आहे.यंदा या प्रभागातून शोभा कवाळे या काँग्रेसकडून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत. कवाळे यांनी त्र्यंबोली महिला मंडळाच्या माध्यमातून प्रभागात संपर्क ठेवला आहे. गेली १५ वर्षे त्या काँग्रेसच्या कार्यकर्त्या म्हणून काम करत असून त्यांनी येथील नागरी समस्यांसह शासकीय योजनांचा लाभ नागरिकांना मिळवून दिला आहे. पल्लवी रामदास जाधव धनंजय महाडिक महिला आघाडीच्या मार्केट यार्डच्या अध्यक्षा आहेत. त्याही यंदा निवडणूक लढविणार आहेत. महिला आघाडीच्या माध्यमातून त्यांनी महिलांच्या कला-गुणांसह त्यांना रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला आहे, तर त्यांचे पती रामदास जाधव यांचा युवाशक्तीचे ‘संपर्क मित्र’ या माध्यमातून सामाजिक कार्यात पुढाकार असल्याने जाधव कुटुंबीयांचा येथे संपर्क आहे. विद्यमान नगरसेवक रशीद बारगीर यांचे समर्थक योगेश लांडगे यांच्या पत्नी वर्षाराणी लांडगे या प्रभागातून निवडणूक लढविणार आहेत. योगेश लांडगे यांनी रशीद बारगीर यांच्यासोबत दहा वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ नागरिकांना करून दिला आहे. रस्ते असो किंवा पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी विशेष प्रयत्न केल्याने त्यांचाही या प्रभागात चांगला संपर्क आहे. माजी उपमहापौर मोहन गोंजारे यांनी निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला आहे. माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस जे उमेदवारी देतील त्यांचा प्रचार करणार असल्याचे गोंजारे यांनी सांगितले. नगरसेवक रशीद बारगीर यांना मानणारा गटही येथे असल्याने त्यांचा पाठिंबा निर्णायक ठरणार आहे.