निखील, रविंद्र आघाडीवर

By Admin | Updated: May 27, 2016 00:47 IST2016-05-27T00:44:59+5:302016-05-27T00:47:13+5:30

राज्य निवड व अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धा

Nikhil, Ravindra leads the front | निखील, रविंद्र आघाडीवर

निखील, रविंद्र आघाडीवर


कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा बुद्धिबळ असोसिएशनच्यावतीने आयोजित महाराष्ट्र राज्य निवड व अजिंक्यपद खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत गुरुवारी तिसऱ्या फेरीअखेर अग्रमानांकीत निखिल दीक्षित, इचलकरंजीचा रविंद्र निकम यांच्यासह पंधरा बुद्धिबळपटू तीन गुणांसह संयुक्तरित्या आघाडीवर आहेत.
तीन गुणांसह आघाडी घेतलेल्या अन्य खेळाडूंमध्ये औरंगाबादचा इंद्रजित महेंद्रकर, पुण्याचा कशिश मनोज जैन, सुनिव वैद्य, कोल्हापूरचा आंचल रस्तोगी, ठाण्याचा राहूल पवार, ऋत्विक गदीया, विशाल गायकवाड (ठाणे), गणेश तजाने (नाशिक), शिवासुब्रहमणियम (नागपूर), गजानन जायडे (ठाणे), श्रीराज भोसले (कोल्हापूर) यांचा समावेश आहे. तर निहाल मुल्ला, बी.एस.नाईक , वरद आठले, ऋजुल शिंदे, आयुश महाजन(कोल्हापूर), अक्षय खेर,प्रविण सावर्डेकर, नेहा मुळे (रत्नागिरी), अभिजीत बिलपे (परभणी), विवेक महाजन (ठाणे), सुजल काळे (औरंगाबाद), हे अकराजण अडीच गुणांसह संयुक्तपणे दुसऱ्या स्थानावर आहेत.
अग्रमानांकीत उत्कर्ष लोमटे, धनंजय इनामदार, आदीत्य सावळकर (कोल्हापूर), लेख मिठावाला (औरंगाबाद), दिपक कुमठाकर (ठाणे), मेहूल भानुशाली (मुंबई),सिद्धांत सावंत (रत्नागिरी) यांच्यासह ५१ जण दोन गुणांसह संयुक्तपणे तृतीय स्थानावर आहेत.

Web Title: Nikhil, Ravindra leads the front