शहरं
Join us  
Trending Stories
1
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
2
Exit Poll 2026: टुडेज चानक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
3
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
4
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
5
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
6
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
7
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
8
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
9
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
10
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
11
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
12
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
13
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
14
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
15
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ५ मे पासून 'या' भागांत ३० तास पाणीपुरवठा बंद; पाहा संपूर्ण यादी
17
Travel : मे महिन्याच्या उन्हातही अनुभवा डिसेंबरची थंडी! भारतातील 'या' थंडगार ठिकाणांना नक्की भेट द्या
18
पाकिस्तानचा 'डबल गेम', अमेरिकेच्या निर्बंधांना झुगारून इराणसाठी सुरू केले ६ व्यापारी भू-मार्ग
19
बंगालमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास काँग्रेस ममता दीदींना पाठिंबा देणार? मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले
20
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाटकच्या मंत्र्याने घालविली स्मशानात रात्र

By admin | Updated: December 9, 2014 01:18 IST

अंधश्रद्धेला विरोध : भुतांचे अस्तित्व नाही

बेळगावी : अंधश्रद्धा आणि भूतप्रेत या विरोधात जनजागृती करण्यासाठी कर्नाटकचे अबकारी शुल्कमंत्री सतीश जारकिहोळी यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह स्मशानभूमीत एक रात्र घालविली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाचे निमित्त साधून जारकिहोळी आणि समर्थकांनी शनिवारी बेळगावी येथील महानगरपालिकेच्या वैकुंठधाम या स्मशानभूमीवर रात्र घालविली. जारकिहोळी आणि शेकडो लोकांनी यावेळी स्मशानातच रात्रीचे जेवण घेतले. लोकांमधील अंधश्रद्धेचे उच्चाटन करण्याच्या उद्देशाने त्यांनी हा उपक्रम राबविला. अंधश्रद्धा ही अनेक समस्यांचे मूळ कारण आहे. ती दूर केल्याशिवाय खालच्या जातीच्या व मागासवर्गाच्या लोकांना न्याय मिळवून देता येणार नाही. बिल गेट लक्ष्मीची पूजा करीत नाही. तरी ते जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती आहेत. मीदेखील लक्ष्मीला मानत नाही. तरीही माझा वार्षिक ६०० कोटी रुपयांची उलाढाल असलेला व्यवसाय आहे, असे जारकिहोळी यांनी स्पष्ट केले. भूताचे अस्तित्व आहे आणि ते स्मशानभूमीसारख्या जागी वास करतात, या अंधश्रद्धेचे निर्मूलन आणि भूतप्रेताची भीती दूर करण्याच्या उद्देशानेच आपण स्मशानात रात्र घालविली, असे कर्नाटकात अंधश्रद्धाविरोधी विधेयक आणण्यासाठी लढा देणारे जारकिहोळी म्हणाले. (वृत्तसंस्था)