शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

आर्थिक फसवणूक; व्हनगुत्ती येथील नवदाम्पत्याने संपवले जीवन, मित्रांनी फोन लोकेशनवरुन शोधले ठिकाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2023 12:03 IST

चार महिन्यांपूर्वी झाला होता विवाह

चुये : व्हनगुत्ती (ता. भुदरगड) येथील नवदाम्पत्याने इस्पुर्ली (ता. करवीर) गावच्या हद्दीत शेडमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. राहुल राजाराम परीट (वय २३), अनुष्का राहुल परीट (२१, रा. व्हनगुत्ती, ता. भुदरगड) अशी आत्महत्या केलेल्या दाम्पत्याची नावे असून, ही घटना गुरुवारी दुपारी चारच्या सुमारास घडली.घटनास्थळावरून व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, व्हनगुत्ती येथील राहुल परीट यांचा चार महिन्यांपूर्वी विवाह झालेला होता. राहुल व पत्नी अनुष्का हे वाळवे (ता. राधानगरी) येथे पाहुण्याच्या घरी जातो असे सांगून गेले होते. वेळेत घरी राहुल आला का नाही म्हणून नातेवाइकांनी फोन लावला असता उचलला नाही. बराच वेळ प्रयत्न करून उचलला नसल्यामुळे त्यांनी व मित्रांनी फोन लोकेशनद्वारे प्रयत्न केला असता त्यांना इस्पुर्ली येथील लोकेशन दाखवले.नातेवाईक व मित्र इस्पुर्लीत आले असता, कोल्हापूर-गारगोटी मार्गावर एक जनावरांचे शेड लोकेशनमध्ये दिसले. त्यांनी शेडचा दरवजा उघडण्याचा प्रयत्न केला असता, आतून बंद होता.दरवाजा मोडून आत प्रवेश केला असता, राहुल व अनुष्का यांनी छत्ताच्या लोखंडी पाईपला गळफास लावून घेतला होता. राहुल याने साडीच्या कपड्याने तर अनुष्काने ओढणीने गळफास लावला असल्याचे दिसून आले. नातेवाइकांनी जवळील इस्पुर्ली पोलिस ठाण्याशी संपर्क करून मृतदेह खाली उतरवले असता, त्यांचा जागेवरच मृत्यू झाला होता.पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सीपीआर हॉस्पिटल कोल्हापूर येथे दाखले केले होते. या घटनेची नोंद इस्पुर्ली पोलिस ठाण्यात झाली असून मयत राहुल यांचे चुलते दत्तात्रय परीट यांनी फिर्याद दिली. राहुल व अनुष्का यांनी आत्महत्या का केली, याचे कारण समजू शकले नाही. राहुल हे एमएसईबी खात्यात कंत्राटी कामगार म्हणून आऊट सोर्सचे काम करत होते. त्यांच्या पश्चात आई, वडील असा परिवार आहे.आर्थिक फसवणूक घटनास्थळी इस्पुर्ली पोलिसांना चिठ्ठी सापडली आहे. त्या चिठ्ठीत आपली आर्थिक फसवणूक झाली असल्यामुळे आपण व पत्नी आत्महत्या करत असल्याचे मजकूर असल्याचा घटनास्थळी बोलले जात होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारी