प्रेमविवाह केलेल्या नवविवाहितेची आत्महत्या

By Admin | Updated: May 15, 2016 01:03 IST2016-05-15T01:03:27+5:302016-05-15T01:03:27+5:30

जयसिंगपुरातील घटना : दोन महिन्यांपूर्वीचा विवाह

Newly-married suicide committed by love-married | प्रेमविवाह केलेल्या नवविवाहितेची आत्महत्या

प्रेमविवाह केलेल्या नवविवाहितेची आत्महत्या

जयसिंगपूर : दोन महिन्यांपूर्वी प्रेमविवाह केलेल्या अकिवाट (ता. शिरोळ) येथील युवतीने विषप्राशन करून जयसिंगपुरात आत्महत्या केली. भाग्यश्री स्वप्नील पल्लके (वय १९, सध्या रा. १३ वी गल्ली, जयसिंगपूर) असे या मृत युवतीचे नाव आहे. याबाबतची नोंद येथील पोलिस ठाण्यात झाली आहे. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकलेले नाही.
स्वप्नील व भाग्यश्री हे अकिवाट येथे शेजारी राहायला होते. दोन महिन्यांपूर्वी दोघांनी पळून जाऊन आंतरजातीय विवाह केला होता. २९ मार्च रोजी ते विवाह करून थेट कुरुंदवाड पोलिस ठाण्यात दाखल झाले होते. भाग्यश्रीने विवाह केल्याने तिच्या घरच्यांनी तिच्याशी काही संबंध ठेवला नाही. त्यानंतर हे दोघे जयसिंगपूर येथील गल्ली नं. १३ मध्ये असलेल्या चौगुले यांच्या इमारतीत भाड्याने राहण्यास आले. तेथे त्यांनी संसार थाटला होता. स्वप्नील हा इचलकरंजीत खासगी नोकरी करीत होता. तो घरी नसताना शुक्रवारी १३ मे रोजी भाग्यश्री हिने दुपारी तीनच्या सुमारास विष प्राशन केले. त्यांच्या शेजाऱ्यांनी व अशोक चौगुले यांनी तिला संजीवनी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले होते. मात्र आज पहाटे सव्वातीनच्या सुमारास तिचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर दोन्ही कुटुंबातील नातेवाईक मोठ्या संख्येने हॉस्पिटलच्या आवारात दाखल झाले. हॉस्पिटलच्या परिसरात तणावग्रस्त परिस्थिती निर्माण झाली होती.

Web Title: Newly-married suicide committed by love-married