शहरं
Join us  
Trending Stories
1
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
2
Exit Poll 2026: टुडेज चानक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
3
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
4
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
5
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
6
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
7
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
8
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
9
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
10
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
11
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
12
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
13
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
14
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
15
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ५ मे पासून 'या' भागांत ३० तास पाणीपुरवठा बंद; पाहा संपूर्ण यादी
17
Travel : मे महिन्याच्या उन्हातही अनुभवा डिसेंबरची थंडी! भारतातील 'या' थंडगार ठिकाणांना नक्की भेट द्या
18
पाकिस्तानचा 'डबल गेम', अमेरिकेच्या निर्बंधांना झुगारून इराणसाठी सुरू केले ६ व्यापारी भू-मार्ग
19
बंगालमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास काँग्रेस ममता दीदींना पाठिंबा देणार? मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले
20
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
Daily Top 2Weekly Top 5

नवजात ‘नकुशी’ रस्त्यावर !

By admin | Updated: December 9, 2014 01:17 IST

मातेने नाकारले : शिरोली पुलाजवळील प्रकार; पोलिसांनी दिली मायेची ऊब

शिरोली : नवजात मुलीला उचलून घेतल्यावर मायेची ऊब लागली आणि ती रडायची थांबली. पुणे-बंगलोर महामार्गावर शिरोली पंचगंगा पुलाशेजारीच असणाऱ्या पीर बालेचॉँदसो दर्ग्याशेजारी मुलगी नको असलेल्या मातापित्यांनी अंदाजे २५ दिवसांच्या नवजात मुलीला कापडात गुंडाळून पालापाचोळ्यात टाकून दिले होते. ही घटना आज, सोमवारी सकाळी सहाच्या सुमारास उघडकीस आली.शिरोली परिसरातील अनेक नागरिक सकाळी फिरण्यासाठी महामार्गाच्या पूर्वेकडील सेवा मार्गावर असतात. सोमवारीही स्क्रॅप व्यावसायिक शमुवेल गोडबोले, शशिकांत नलवडे, सुजित समुद्रे, प्रकाश कांबळे हे सकाळी सहा वाजता फिरण्यासाठी गेले होते. पंचगंगा पुलाजवळील दर्ग्याजवळ शमुवेल गोडबोले यांना या बालिकेच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. गोडबोले व इतरांनी जवळ जाऊन पाहिले असता नवजात मुलगी कापडात गुंडाळून पाल्यात टाकली होती. सकाळी नदी किनाऱ्यावर धुके आणि कडाक्याच्या थंडीत हे नवजात बालक कुडकुडत होते. गोडबोले यांनी तत्काळ शिरोली पोलीस ठाण्यात संपर्क साधला.महिला कॉन्स्टेबल नंदा शिंदे यांनी रडणाऱ्या नवजात मुलीला उचलून घेतले आणि मायेची उब लागताच मुलगी शांत झाली. या मुलीला शेजारी दुधाने भरलेली बाटली ठेवली होती. या मुलीला घेऊन पोलीस नाईक दिलीप कुंभार, प्रमोद पाटील, बाबा चौगले हे शिरोली पोलीस ठाण्यात आले. महिला कॉन्स्टेबल नंदा शिंदेंनी नवजात मुलीच्या अंगावरील थंडीने ओले झालेले कपडे काढले. शेजारील व संतोष हॉटेल मालकाच्या पत्नीकडून दुसरे कपडे घेऊन या मुलीला अंगावर टाकून गुंडाळले. तिला बाटलीने दूध पाजले. रात्रभर रडत असलेली ही मुलगी दुधामुळे शांत झोपली. शिरोली पोलिसांनी या नवजात मुलीला कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात दाखल केले आहे. सीपीआरमधील डॉक्टरांनीही तिला ताबडतोब उपचार सुरू केले. हे नवजात गोंडस बालक पाहून अनेकांचे मन हेलावले. (प्रतिनिधी)