दक्षिण महाराष्ट्रात परतीच्या पावसाचा नवा उच्चांक, कोल्हापूरात पाच पट पाऊस

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2019 06:06 AM2019-11-08T06:06:43+5:302019-11-08T06:06:48+5:30

मोठे नुकसान पण दुष्काळी भाग जलसमृद्ध; कोल्हापूरात पाच पट पाऊस

New record high rainfall in southern Maharashtra, five times the rainfall in Kolhapur | दक्षिण महाराष्ट्रात परतीच्या पावसाचा नवा उच्चांक, कोल्हापूरात पाच पट पाऊस

दक्षिण महाराष्ट्रात परतीच्या पावसाचा नवा उच्चांक, कोल्हापूरात पाच पट पाऊस

Next

कोल्हापूर: महापूराने आधीच दैना करुन सोडलेल्या दक्षिण महाराष्ट्रात कधी नव्हे इतका परतीच्या पावसाने धूूमाकूळ घातल्याने कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्णांतील शेतीचे अतोनात नुकसान झाले. विशेष म्हणजे दक्षिण महाराष्ट्रात परतीच्या पावसाने विक्रमी नोंद केली आहे. कोल्हापुरात सरासरीपेक्षा पाच पट तर सांगलीत सरासरीपेक्षा अडीच पट पावसाची नोंद झाली आहे. साताऱ्यातही गतवर्षीपेक्षा तिप्पट परतीचा पाऊस पडला आहे.

कोल्हापूर जिल्ह्णात यंदा आॅक्टोबर महिन्यात ३११० मिलिमीटर म्हणजेच सरासरी २६० मिलिमीटर इतक्या विक्रमी पावसाची नोंद झाली. सांगली जिल्ह्णात आजपर्यंत आॅक्टोबर महिन्यातील सरासरी पाऊस १०५ मिलिमीटर इतका राहिला आहे. यंदा जिल्ह्णात सरासरी २६१.८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सातारा जिल्ह्णात यावर्षी तब्बल १७०० हून अधिक मिलिमीटर पाऊस झाला आहे. ही टक्केवारी १९१ इतकी आहे. आॅक्टोबरमध्ये सरासरी ८४ मिलीमीटर पाऊस पडतो. यंदा मात्र २५६ मिलिमीटर पाऊस पडला आहे. या पावसामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाल्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे.

(दक्षिण महाराष्ट्रात आॅक्टोबर महिन्यात पडणारा
सरासरी पाऊस आणि यंदा पडलेला सरासरी पाऊस)
जिल्हा सरासरी पाऊस यंदाचा पाऊस
कोल्हापूर ५० मि.मी. २६० मि.मी.
सांगली १०५ मि.मी. २६१ मि.मी.
सातारा ८४ मि.मी. २५६ मि.मी.

दुष्काळी भागाची पाण्याची तहान मिटली
एरव्ही पाण्यासाठी वणवण कराव्या लागणाºया दुष्काळी भागातही यंदा परतीचा पाऊस मोठ्या प्रमाणात बरसला आहे. विशेष म्हणजे सांगली जिल्ह्णात सधन भागापेक्षा दुष्काळी भागात परतीचा पाऊस अधिक पडला आहे. तर साताºयातही माण, खटाव तालुक्यातही परतीच्या पाऊसाचा मोठा जोर होता.
 

Web Title: New record high rainfall in southern Maharashtra, five times the rainfall in Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.