शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
5
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
6
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
7
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
8
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
9
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
10
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
11
आयोग नव्हे, मतदारच राजा !
12
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
13
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
14
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
15
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
16
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
17
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
18
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
19
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
20
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी

कोल्हापुरी गुळाला नवी ओळख, शेतकऱ्याने बनविले सेंद्रिय गुळाचे चॉकलेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2022 17:23 IST

लोह व कँल्शिअमसाठी कोल्हापूर गुळाचे सेवन लाभदायक असल्याचे आयुर्वेदात नोंद

प्रकाश पाटीलकोपार्डे-  कोल्हापुरी गुळाला जगात मोठी मागणी आहे. पण याची लज्जत व चव लहान थोरांपर्यंत पोहचवण्याचा व्यावसायिक दृष्टिकोन समोर ठेवून शिंदेवाडी ता. करवीर येथील राजेंद्र वडगावकर या शेतकऱ्याने आयुर्वेदिक व सेंद्रिय गुळाच्या चॉकलेट कँडीचे उत्पादन सुरू आहे. सध्या दररोज २०० ते ३०० किलो चॉकलेटचे उत्पादन सुरू आहे. महाराष्ट्रातच काय देशातील हे गुळ चॉकलेट कँडीचे उत्पादन करणारे एकमेव शेतकरी आहेत.कोल्हापूरच्या मातीत असणाऱ्या गुणधर्मामुळे येथील गुळाची चव व प्रत आरोग्यवर्धक आहे. लोह व कँल्शिअमसाठी कोल्हापूर गुळाचे सेवन लाभदायक असल्याचे आयुर्वेदात नोंद आहे. पण अनेक वर्षापासून ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्न झालेले दिसत नव्हते.मात्र, शिंदेवाडीचे शेतकरी राजेंद्र वडगावकर यांनी गुळाची चव लहान थोरांना चाखता यावी व तीही माफक दरात कशी देता येईल यावर दोन वर्षे अभ्यास केला. अन्न व औषध प्रशासनाच्या चार लायसन्स बरोबर ही चॉकलेट बनवण्यासाठी यंत्र सामग्रीची जुळवाजुळव सुरू केली. तयार गुळ लवकर थंड होऊ नये यासाठी स्टेनलेस स्टीलचा वाफा, चॉकलेट बनवण्यासाठी सिलिकॉनचे साचे, यासाठी पँकिंग लोगो, मशीन यासाठी १० ते १२ लाख भांडवल गुंतले आहे. गेल्याच आठवड्यापासून आयुर्वेदिक व सेंद्रिय गुळाची १० ग्रँमच्या चॉकलेट कँडीचे उत्पादन सुरू केले आहे. दररोज २०० ते ३०० किलो गुळाची चॉकलेट तयार करण्यात येत आहेत.चॉकलेटमधून किलोला २०० रुपये दरस्थानिक बाजारपेठेत ४० रूपये प्रतिकिलो दर मिळत आहे. मात्र चॉकलेट मधून किलोला २०० रूपये किलो दर मिळणार आहे. यात सुंट,लवंग,वेलची व बडीशेप वापरून चॉकलेट लज्जतदार व आरोग्य वर्धक बनवण्यात आले आहे. 

आमचा गुर्हाळघराचा पनजोबा आजोबा पासून ४५ ते ५० वर्षे व्यवसाय आहे. पारंपरिक व्यवसायाला आधुनिकतेची जोड देण्याचा विचार आला.आणि गुळाची चॉकलेट कँडीची संकल्पना सुचली. मी कंपनी स्थापन केली असून सर्व लायसन्स घेतल्या आहेत. या आयुर्वेदिक गुळ चॉकलेट कँडीला मागणी होत आहे. महाराष्ट्रात हे पहिलेच उत्पादन आहे. -  राजेंद्र वडगावकर (गुळ चॉकलेट कँडीचे उत्पादक शिंदेवाडी ता. करवीर)

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFarmerशेतकरी