शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसच्या नवनिर्वाचित आमदारांचा मुंबईत सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2019 12:22 IST

राज्यातील काँग्रेसच्या नवनिर्वाचित आमदारांचा मुंबईतील टिळक भवनमध्ये अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मल्लिकार्जुन खर्गे आणि महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यात कोल्हापूरमधील आमदार चंद्रकांत जाधव, राजूबाबा आवळे आणि ऋतुराज पाटील यांचा सत्कार झाला.

ठळक मुद्देचंद्रकांत जाधव, राजूबाबा आवळे, ऋतुराज पाटील यांचा समावेश कोल्हापूर भाजपमुक्त केल्याबद्दल अभिनंदन

कोल्हापूर : राज्यातील काँग्रेसच्या नवनिर्वाचित आमदारांचा मुंबईतील टिळक भवनमध्ये अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मल्लिकार्जुन खर्गे आणि महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यात कोल्हापूरमधीलआमदार चंद्रकांत जाधव, राजूबाबा आवळे आणि ऋतुराज पाटील यांचा समावेश होता.

कोल्हापूर भाजपमुक्त केल्याबद्दल जिल्ह्यातील काँग्रेसचे सर्व नवनिर्वाचित आमदार आणि आमदार सतेज पाटील यांचे खर्गे यांनी अभिनंदन केले. काँग्रेसला साथ दिल्याबद्दल कोल्हापूरच्या जनतेला त्यांनी धन्यवाद दिले.या कार्यक्रमात कोल्हापूरकर आणि नवनिर्वाचित आमदारांच्या वतीने मल्लिकार्जुन खर्गे यांना पुष्पगुच्छ देऊन आमदार सतेज पाटील आणि चंद्रकांत जाधव यांनी सत्कार केला. राज्यातील नवनिर्वाचित युवा आमदारांनी संयुक्तपणे खर्गे यांचा सत्कार केला.

यावेळी माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण प्रमुख उपस्थित होते. नवनिर्वाचित आमदारांनी जनतेचे प्रश्न, समस्या सोडविण्यासह विकासकामांवर भर द्यावा. युवा आमदारांनी राजकारणातील बारकावे समजून घेऊन कार्यरत राहावे, असे आवाहन मल्लिकार्जुन खर्गे यांनी यावेळी केले असल्याचे आमदार ऋतुराज पाटील यांनी सांगितले. दरम्यान, भोगावती साखर कारखान्याची सभा असल्याने आमदार पी. एन. पाटील हे या कार्यक्रमास उपस्थित राहू शकले नाहीत.

राज्यातील काँग्रेसच्या नवनिर्वाचित आमदारांच्या सत्काराचा कार्यक्रम मुंबईत प्रदेश काँग्रेस कार्यालयाकडून करण्यात आला. त्यात आमदार सतेज पाटील आणि चंद्रकांत जाधव यांनी पुष्पगुच्छ देऊन अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मल्लिकार्जुन खर्गे यांचा सत्कार केला. यावेळी डावीकडून आमदार राजूबाबा आवळे, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, आमदार ऋतुराज पाटील, आदी उपस्थित होते. 

 

टॅग्स :congressकाँग्रेसkolhapurकोल्हापूरMLAआमदार