नेसरीच्या शिवशक्ती पतसंस्थेला ८० लाखांचा नफा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 04:14 IST2021-03-30T04:14:23+5:302021-03-30T04:14:23+5:30

येथील शिवशक्ती पतसंस्थेची ३३ वी वार्षिक सभा ऑनलाईन पार पडली. संस्थाध्यक्ष संजय कोरी अध्यक्षस्थानी होते. व्यवस्थापक सुरेश गुंडे ...

Nesari's Shiv Shakti Patsanstha makes a profit of Rs 80 lakh | नेसरीच्या शिवशक्ती पतसंस्थेला ८० लाखांचा नफा

नेसरीच्या शिवशक्ती पतसंस्थेला ८० लाखांचा नफा

येथील शिवशक्ती पतसंस्थेची ३३ वी वार्षिक सभा ऑनलाईन पार पडली. संस्थाध्यक्ष संजय कोरी अध्यक्षस्थानी होते.

व्यवस्थापक सुरेश गुंडे यांनी अहवालवाचन केले. अहवाल वर्षात संस्थेला ८० लाख ७३ हजार इतका नफा झाला असून, १५ टक्के लाभांश वाटप झाले.

संस्थेचे वसुली भागभांडवल १ कोटी १ लाख २३ हजार, निधी ५ कोटी २७ लाख ३३ हजार, तर ठेवी २९ कोटी ५० लाख ४२ हजार आहेत.

संस्थेने १९ कोटी ३ लाख २६ हजारांचे कर्ज वितरित केले आहे. संस्थेचा एनपीए शून्य टक्के आहे.

यावेळी संचालक संगाप्पा साखरे, महारूद्र हिरेमठ, अमर हिडदुगी, अनिल पेडणेकर, सुवर्णा गुंजाटी, लक्ष्मी हुक्केरी, महावीर वणकुंद्रे यांच्यासह सभासदांनी ऑनलाईन उपस्थित राहून सभा कामकाजात भाग घेतला. उपाध्यक्ष भिकाजी भारती यांनी आभार मानले.

* फोटो ओळी : नेसरी (ता. गडहिंग्लज) येथील शिवशक्ती पतसंस्थेच्या ऑनलाईन सभेत अहवालवाचन करताना शाखाधिकारी सुरेश गुंडे. शेजारी संचालक मंडळ व पदाधिकारी.

क्रमांक : २९०३२०२१-गड-०४

Web Title: Nesari's Shiv Shakti Patsanstha makes a profit of Rs 80 lakh