नेहा चौगले हिची जागतिक कुस्ती स्पर्धेसाठी निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:17 IST2021-06-22T04:17:07+5:302021-06-22T04:17:07+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : लोकनेते सदाशिवराव मंडलिक राष्ट्रीय (साई) कुस्ती संकुल, मुरगुडची मल्ल नेहा किरण चौगले हिची बुडापेस्ट ...

Neha Chougale selected for World Wrestling Championship | नेहा चौगले हिची जागतिक कुस्ती स्पर्धेसाठी निवड

नेहा चौगले हिची जागतिक कुस्ती स्पर्धेसाठी निवड

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : लोकनेते सदाशिवराव मंडलिक राष्ट्रीय (साई) कुस्ती संकुल, मुरगुडची मल्ल नेहा किरण चौगले हिची बुडापेस्ट (हंगेरी) येथे होणाऱ्या सबज्युनिअर (कॅडेट) जागतिक कुस्ती स्पर्धेसाठी भारतीय कुस्ती संघात निवड झाली आहे. मुलींमध्ये महाराष्ट्रातून निवड होणारी नेहा एकमेव मल्ल आहे.

दिल्ली येथील इंदिरा गांधी स्टेडियम येथे सोमवारी पार पडलेल्या निवड चाचणीत ४९ किलो वजन गटात तिची भारतीय संघात निवड झाली. या निवड चाचणीत नेहाने पंजाबची मल्ल मनप्रित हिला १० विरुध्द ०, हरियाणाच्या आरतीला ४ विरुध्द २ गुणांनी पराभूत करत संघात स्थान मिळवले. तिला ‘एआएस’चे कुस्ती प्रशिक्षक दादासाहेब लवटे, माजी नगराध्यक्ष सुखदेव येरुडकर, दयानंद खतकर, सागर देसाई यांचे मार्गदर्शन लाभले तर खासदार संजय मंडलिक, विरेंद्र मंडलिक, ‘साई’चे राज्य समन्वयक चंद्रकांत चव्हाण यांच्यासह महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद, कोल्हापूर जिल्हा व शहर राष्ट्रीय तालीम संघांचे प्रोत्साहन लाभले.

Web Title: Neha Chougale selected for World Wrestling Championship