शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर जिल्ह्यातील पोलिसांचा गृहप्रकल्प स्वप्नवतच!, ठेकेदाराचे दुर्लक्ष

By तानाजी पोवार | Updated: August 1, 2022 18:38 IST

अवघी ३८० स्क्वेअर फुटांची घरे, आठ फूट उंची, गळके छप्पर, गिलावाची ढपले पडलेल्या भिंती, अशा पोलीस वसाहतीत अंधार कोठडीत पोलिसांची कुटुंबे जीवन जगत होती.

तानाजी पोवारकोल्हापूर : जिल्ह्यातील १,२७८ पोलीस अंमलदारांना सुसज्ज व अद्ययावत घरे देण्याची शासनाने घोषणा केली, नव्या शासनानेही निधी कमी पडू देणार नाही, असे आश्वासन दिले; पण बांधकाम ठेकेदाराच्या दुर्लक्षामुळे १६७ घरांचा जुना बुधवार पेठेतील पोलिसांचा गृहप्रकल्प स्वप्नवतच राहणार काय? अशी स्थिती झाली. मार्च २०२१ पर्यंत तीन इमारतींचा हा प्रकल्प पूर्ण करण्याची मुदत असताना फक्त दोनच इमारतींचे काम ७० टक्के झाले, तर तिसऱ्या इमारतीचा एकच स्लॅब झाला अन् काम रखडले आहे.

जिल्ह्यातील पोलीस वसाहती किमान शंभर वर्षांपूर्वीच्या आहेत. अवघी ३८० स्क्वेअर फुटांची घरे, आठ फूट उंची, गळके छप्पर, गिलावाची ढपले पडलेल्या भिंती, अशा पोलीस वसाहतीत अंधार कोठडीत पोलिसांची कुटुंबे जीवन जगत होती.

दिवसभर बंदोबस्तात कंटाळलेल्या पोलिसांना सुसज्ज घरे मिळावीत याच उद्देशाने पोलिसांच्या वसाहतीचे रूप पालटण्यासाठी शासनाने निधीही मंजूर केला. जिल्ह्यातील पोलीस मुख्यालय, जुनी बुधवार पेठ, लक्ष्मीपुरी, तसेच इचलकरंजी येथील जुन्या वसाहती पाडून तेथे नव्या गृहप्रकल्पाला मंजुरी दिली.

जुना बुधवार पेठेतील सुमारे १९ हजार स्क्वेअर फूट जागेत गृहप्रकल्पाच्या तीन इमारतीमध्ये १६७ फ्लॅटचे कामाला मंजुरी मिळाली. ठेकेदाराला दिलेली काम पूर्णत्वाची मुदत मार्च २०२२ ला संपली तरीही सहा आणि सात मजली इमारतीचे काम फक्त ७० टक्केच पूर्ण झाले, तर नऊ मजली इमारतीचा फक्त पहिलाच स्लॅब पडला आहे. त्यासाठी २८ कोटी निधीही दिला आहे. ही कामे सांगलीतील बांधकाम ठेकेदारामार्फत सुरू असून, पोलीस हाउसिंग मंडळ, वरळी, मुंबई यांच्या आधिपत्याखाली कामे सुरू आहेत.

जिल्ह्यातील मंजूर पोलीस गृहप्रकल्पांची सद्य:स्थिती

  • पोलीस मुख्यालय (मंजूर ६९७ घरे) : जुनी वसाहत पाडली, प्रकल्पाचे काम आठवड्यात सुरू होण्याची शक्यता.
  • लक्ष्मीपुरी (मंजूर २०० घरे) : जुनी वसाहत पाडण्याचे काम सुरू.
  • इचलकरंजी (मंजूर २१४ घरे) : तिसरा स्लॅबचे काम सुरू.

जुना बुधवार पेठेतील पोलीस गृहप्रकल्पाचे काम पोलीस हाउसिंग मंडळ मुंबईच्या आधिपत्याखाली सुरू आहे, ठेकेदाराच्या आर्थिक अडचणीमुळे प्रकल्पाचे काम रेंगाळले आहे, त्याबाबत ठेकेदाराला हाउसिंग मंडळामार्फत नोटीस बजावली आहे. -शैलेश बलकवडे, पोलीस अधीक्षक, कोल्हापूर जिल्हा

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliceपोलिसHomeसुंदर गृहनियोजन