दोन तासात कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्हचा निगेटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:27 IST2021-05-25T04:27:02+5:302021-05-25T04:27:02+5:30

प्रकरणाची सखोल चौकशी करावी : नगरसेविका मंगल मुसळे यांची मागणी लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : येथील दत्तनगर परिसरात राहणाऱ्या ...

Negative of Corona report positive in two hours | दोन तासात कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्हचा निगेटिव्ह

दोन तासात कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्हचा निगेटिव्ह

प्रकरणाची सखोल चौकशी करावी : नगरसेविका मंगल मुसळे यांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क

इचलकरंजी : येथील दत्तनगर परिसरात राहणाऱ्या ऋषिकेश बंडोपंत मुसळे या युवकाचा कोरोना अहवाल एकाचदिवशी पॉझिटिव्ह व निगेटिव्ह असा वेगवेगळा आल्याने संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. या प्रकारामुळे संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यामुळे या घटनेची सखोल चौकशी करावी, अशी मागणी नगरसेविका मंगल बंडोपंत मुसळे यांनी निवेदनाद्वारे मुख्याधिकारी यांच्याकडे केली आहे.

निवेदनात, ऋषिकेश याला अस्वस्थ वाटत होते. त्यामुळे शनिवार (दि. २२) सकाळी साडेदहा वाजता त्याची पॅथॉलॉजी लॅबोरेटरी येथे कोरोना तपासणी केली. यावेळी कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे पुन्हा एकदा खात्री करून घेण्यासाठी त्याचदिवशी ताबडतोब कृष्णा डायग्नोस्टिक्समध्ये कोरोनाची फेरतपासणी करून घेतली. यावेळी त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. एकाच दिवशी काही तासातच दोन वेगवेगळे अहवाल आल्यामुळे मुसळे यांना मानसिक त्रास सहन करावा लागला.

चुकीच्या पद्धतीने अहवाल देऊन नागरिकांची आर्थिक लूट सुरू आहे. त्यामुळे प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी; अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Web Title: Negative of Corona report positive in two hours