शहरं
Join us  
Trending Stories
1
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
2
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
3
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
4
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
5
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
7
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
8
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
9
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
10
Shark Tank India नं 'या' Startup ला पाठवली कायदेशीर नोटीस, वाचा नक्की कशावरुन झाला वाद?
11
एसटी बसेस निवडणूक कामात व्यस्त, प्रवासी मात्र त्रस्त
12
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
13
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
14
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
15
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
16
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
17
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
18
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
19
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
20
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज

जैन धर्माच्या शिकवणीची गरज--श्रीमंत कोकाटे यांचे मत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2017 12:44 AM

जयसिंगपूर : सध्याच्या माहिती तंत्रज्ञान युगात जगामध्ये प्रांतिक, जातीय, भाषेवर हल्ले होत आहेत.

ठळक मुद्देजयसिंगपुरात मराठी जैन साहित्य संमेलनाचे उद्घाटन जैन धर्म हा वैज्ञानिक दृष्टिकोनातून वाटचाल करीत आहेत्यांनी अंधश्रद्धा, कर्मकांड याला कधीच थारा दिला नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कजयसिंगपूर : सध्याच्या माहिती तंत्रज्ञान युगात जगामध्ये प्रांतिक, जातीय, भाषेवर हल्ले होत आहेत. याला रोखायचे असेल तर हजारो वर्षांचा इतिहास असलेल्या जैन धर्माच्या शिकवणीची आज गरज निर्माण झाली आहे. मराठी जैन साहित्यामुळे महाराष्ट्रात समता, अहिंसा, सहिष्णुता आणि पुरोगामी विचार लोकांच्यात रुजावा, असा आदर्श निर्माण होऊन तो सुवर्ण अक्षराने लिहिला जावा, अशी अपेक्षा इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्र जैन साहित्य परिषद, कोल्हापूर यांच्यावतीने येथील चौथ्या गल्लीतील सोनाबाई सुरेंद्र इंगळे व इंद्रध्वज सभागृहामध्ये जैन साहित्य संमेलन जयसिंगपूर यांच्यावतीने२२ व्या मराठी साहित्य संमेलनाला शुक्रवारी प्रारंभ झाला. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानीडॉ. लीलावती शहा होत्या. यावेळी श्रीमंत कोकाटेंसह मान्यवरांच्या हस्ते मराठी जैन साहित्य संमेलनाचे मोठ्या दिमाखात उद्घाटन झाले.डॉ. लीलावती शहा म्हणाल्या, जैन धर्म हा वैज्ञानिक दृष्टिकोनातून वाटचाल करीत आहे. त्यांनी अंधश्रद्धा, कर्मकांड याला कधीच थारा दिला नाही. जैन साहित्यिक हे प्रेरणादायी असून, तरुण लेखकांनी जैन धर्माचा खरा इतिहास सांगावा.

अशा प्रकारच्या साहित्य संमेलनात तरुणांचा सहभाग व्हावा, लेखकांनी वाचन आणि लिखाणातून नवे साहित्य निर्माण करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. स्वागताध्यक्ष डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी जयसिंगपूर शहर हे अहिंसा प्रवतेने गुण्यागोविंदाने नांदत आहे. सर्व जाती धर्मांना येथे अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त आहे. या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून सर्वांना एकत्रित करून समाज प्रबोधनाचा निर्णय घेतला आहे.

जैन साहित्य परिषदेचे मुख्य सचिव डॉ. रावसाहेब पाटील यांनी स्वागत, तर सचिव प्रा. डी. ए. पाटील यांनी प्रास्ताविक केले. यावेळी प. पू. स्वस्तिश्री भट्टारक डॉ. लक्ष्मीसेन महास्वामीजी कोल्हापूर, प. पू. स्वस्तिश्री भट्टारक जिनसेन महास्वामीजी नांदणी यांचे आशीर्वचन झाले. सागर चौगुले यांनी आभार मानले. यावेळी नगराध्यक्षा डॉ. नीता माने, उपनगराध्यक्ष संजय पाटील-यड्रावकर, शैलेश चौगुले, प्रकाश झेले, मोहन पाटील, विजय आवटी, महावीर अक्कोळे, राजेंद्र नांद्रेकर, आदिनाथ कुरुंदवाडे, भालचंद्र वग्याणी, आदी उपस्थित होते.जयसिंगपूर येथे शुक्रवारी २२ व्या मराठी जैन साहित्य संमेलनाचे उद्घाटन झाले. यावेळी प्रा. श्रीमंत कोकाटे, नगराध्यक्षा डॉ. नीता माने, डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर, संजय पाटील-यड्रावकर, सागर चौगुले, दादा पाटील-चिंचवाडकर, प. पू. स्वस्तिश्री भट्टारक डॉ. लक्ष्मीसेन महास्वामीजी, प. पू. स्वस्तिश्री भट्टारक जिनसेन महास्वामीजी, भालचंद्र वग्याणी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.