सतेज हा जीवन शिक्षण विद्यामंदिर अर्जुनवाडा या शाळेत पाचवीच्या वर्गात शिकतो आहे, अनेक दिवसांपासून नसा दुखण्याचा त्रास त्याला सुरू होता. सर्व टेस्टनंतर त्याला लाखांमध्ये एखाद्याला होणार गिलाउम बॅरे सिंड्रोम हा रोग झाल्याचं समजलं, त्याच्यावर ॲपल सरस्वती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत, उपचारासाठी दहा ते बारा लाखांवर खर्च येणार असल्याने त्याच्या कुटुंबीयांसमोर मोठं आव्हान निर्माण झालंय, सतेजचे वडील सचिन हे एसटीमध्ये वाहक म्हणून काम पाहतात, त्याची घरची परिस्थिती बेताची असल्याने आर्थिक मदतीची गरज आहे, हा रोग शासकीय योजनांमध्ये बसत नसल्याने ग्रामस्थांनी वर्गणी काढून सुमारे दोन लाख रुपयांचा निधी जमा केला आहे. उर्वरित रक्कम दानशूर लोकांनी मदत देण्याचं आवाहन ग्रामपंचायत अर्जुनवाडाच्या वतीने करण्यात आले आहे.
फोटो सतेज सचिन पाटील