भांडवलशाहीविरुद्ध लढा उभारण्याची गरज : राजू शेट्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:20 IST2021-01-04T04:20:51+5:302021-01-04T04:20:51+5:30
जयसिंगपूर : चळवळीचा हेतू स्पष्ट असला की चळवळीची ध्येय आणि उद्दिष्टे साध्य होतात. शाळा आणि महाविद्यालय या नफेखोरीसाठी नसून ...

भांडवलशाहीविरुद्ध लढा उभारण्याची गरज : राजू शेट्टी
जयसिंगपूर : चळवळीचा हेतू स्पष्ट असला की चळवळीची ध्येय आणि उद्दिष्टे साध्य होतात. शाळा आणि महाविद्यालय या नफेखोरीसाठी नसून ज्ञान आदान-प्रदानासाठी असतात. परंतु, सध्याच्या काळात या पैशाच्या स्रोत बनल्या आहेत आणि यातून भांडवलशाही पुढे येत आहेत. याविरुद्ध लढा उभा करणे ही गरज बनली आहे, असे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी केले. जयसिंगपूर येथील आयएमए सभागृहात स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेच्या पदाधिकारी नियुक्ती मेळावा पार पडला. यावेळी शेट्टी म्हणाले, विद्यार्थी चळवळ ही लोक चळवळ बनली पाहिजे. माझ्यावर विद्यार्थिदशेतच चळवळीचे संस्कार झाले म्हणूनच मी घडलो. विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून अनेक प्रश्न मार्गी निघाले आहेत. शिक्षणाचा बाजार होऊ नये, याची कटाक्षाने काळजी घेतली पाहिजे. स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून एक नवे आंदोलन उभे करू, अशी घोषणा त्यांनी केली.
स्वाभिमानी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष प्रा. डॉ. जालिंदर पाटील यांनी विद्यार्थी चळवळीचा इतिहास नमूद करून चळवळ कशी उभी केली पाहिजे, संघटन कसे असले पाहिजे आणि योग्य ध्येय व धोरणे आखून चळवळ कशी पुढे नेता येईल याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी नूतन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली.
याप्रसंगी सावकर मादनाईक, अमोल हिप्परगे, जनार्दन पाटील, मिलिंद साखरपे, सागर शंभूशेटे, मिलिंद साखरपे, सचिन शिंदे, शैलेश आडके, तानाजी वठारे, सौरभ शेट्टी यांच्यासह सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतील विद्यार्थी उपस्थित होते.
फोटो - ०३०१२०२१-जेएवाय-०१
फोटो ओळ - जयसिंगपूर येथे विद्यार्थी परिषदेत पदनियुक्ती व अभ्यास शिबिर पार पडले.