Video : कोल्हापूरजवळ चोरट्यांचा बँकेवर धाडसी दरोडा, सव्वा कोटीची रक्कम लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2019 01:44 PM2019-02-08T13:44:44+5:302019-02-08T15:11:00+5:30

कोल्हापूरजवळील कळे (ता. पन्हाळा) येथील बँकेवर चोरट्यांनी धाडसी दरोडा टाकून बँक फोडल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. चोरट्यांनी सव्वाकोटीची रक्कम लंपास केली आहे. पोलिसांना ही घटना कळताच त्यांनी तत्काळ कळे येथे घटनास्थळी श्वानपथकासह धाव घेतली आहे.

Near the Kolhapur looted the robbery of thieves on the bank of thieves | Video : कोल्हापूरजवळ चोरट्यांचा बँकेवर धाडसी दरोडा, सव्वा कोटीची रक्कम लंपास

Video : कोल्हापूरजवळ चोरट्यांचा बँकेवर धाडसी दरोडा, सव्वा कोटीची रक्कम लंपास

Next
ठळक मुद्देकोल्हापूरजवळ चोरट्यांचा बँकेवर धाडसी दरोडासव्वा कोटीची रक्कम लंपास

कोल्हापूर : कोल्हापूरजवळील कळे (ता. पन्हाळा) येथील बँकेवर चोरट्यांनी धाडसी दरोडा टाकून बँक फोडल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. चोरट्यांनी सव्वाकोटीची रक्कम लंपास केली आहे. पोलिसांना ही घटना कळताच त्यांनी तत्काळ कळे येथे घटनास्थळी श्वानपथकासह धाव घेतली आहे.



कुडित्रे येथील यशवंत बँकेच्या कळे शाखेत चोरट्यांनी रात्री धाडसी दरोडा टाकला. चोरट्यांनी कटरचा उपयोग करुन सर्वप्रथम बँकेची खिडकी कापून आत प्रवेश केला. आत प्रवेश केल्यानंतर चोरट्यांनी प्रथम सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे कनेक्शन तोडले. त्यानंतर बँकेचे लॉकर फोडून आतील रक्कम लंपास केली.

या लॉकरमधील अंदाजे ८ लाख ५७ हजार रुपयांची रक्कम चोरट्यांनी लंपास केली असली तरी नेमकी किती रक्कम आहे, हे अद्याप समजलेले नाही. तारण ठेवलेले सोन्याचीही चोरट्यांनी चोरी केली असून त्याचे मोजमाप सुरु आहे.


दरम्यान, या दरोड्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी श्वानपथकासह धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा सुरू केला असून अजून किती रक्कम चोरीस गेली याचा अंदाज आलेला नाही. पोलिसांचा श्वानपथकामार्फत कसून शोधमोहीम सुरू आहे.

Web Title: Near the Kolhapur looted the robbery of thieves on the bank of thieves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.