कोल्हापूर सर्किट बेंचबाबत एन.डीं. पाटील यांची मुख्यमंत्र्यासमवेत चर्चा

By Admin | Updated: March 13, 2017 14:18 IST2017-03-13T14:18:22+5:302017-03-13T14:18:22+5:30

लवकर बैठक बोलावण्याची मागणी

ND to Kolhapur Circuit Bench Discussion with Patil CM | कोल्हापूर सर्किट बेंचबाबत एन.डीं. पाटील यांची मुख्यमंत्र्यासमवेत चर्चा

कोल्हापूर सर्किट बेंचबाबत एन.डीं. पाटील यांची मुख्यमंत्र्यासमवेत चर्चा

कोल्हापूर सर्किट बेंचबाबत एन.डीं. पाटील यांची मुख्यमंत्र्यासमवेत चर्चा
कोल्हापूर : कोल्हापूर सर्किट बेंचसंदर्भात ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांनी सोमवारी दूरध्वनीवरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली आहे.यावेळी त्यांनी याबाबत लवकर बैठक बोलावण्याची मागणी केली आहे. पण, सध्या उन्हाळी अधिवेशन सुरु असल्यामुळे सद्यस्थितीत ही बैठक होण्याची शक्यता कमी आहे.
दरम्यान, खंडपीठ कृति समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश मोरे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी सोमवारी आमदार राजेश क्षीरसागर यांची सकाळी शनिवार पेठेतील त्यांच्या निवासस्थानी या प्रश्नी भेट घेतली.
एक डिसेंबर २०१६ पासून येथील न्यायसंकुल इमारतीजवळ याप्रश्नी साखळी उपोषण सुरु आहे. या उपोषणाला १०० दिवस पूर्ण झाले आहेत. जिल्ह्यातील शिवसेनेचे सहा आणि भाजपाच्या दोन आमदारांनी या अधिवेशनात सर्किट बेंच कोल्हापुरात होण्याबाबत लक्षवेधी मांडली आहे. त्यावर २० मार्च रोजी चर्चा होणार आहे.

Web Title: ND to Kolhapur Circuit Bench Discussion with Patil CM