एन.डी. व सरोज पाटील यांना ‘शरद-प्रतिभा’ पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 04:41 IST2020-12-12T04:41:16+5:302020-12-12T04:41:16+5:30

कोल्हापूर : मी कास्ट फ्री मूव्हमेंटतर्फे प्रा. एन. डी. पाटील व त्यांच्या पत्नी सरोज ऊर्फ माई पाटील यांना पहिला ...

N.D. And Saroj Patil's 'Sharad-Pratibha' award | एन.डी. व सरोज पाटील यांना ‘शरद-प्रतिभा’ पुरस्कार

एन.डी. व सरोज पाटील यांना ‘शरद-प्रतिभा’ पुरस्कार

कोल्हापूर : मी कास्ट फ्री मूव्हमेंटतर्फे प्रा. एन. डी. पाटील व त्यांच्या पत्नी सरोज ऊर्फ माई पाटील यांना पहिला शरद-प्रतिभा पुरस्कार जाहीर झाला आहे. रोख ५० हजार रुपये, सत्यशोधक पोशाख, शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. संस्थेचे अध्यक्ष लेखक, दिग्दर्शक डॉ. प्रशांत गेडाम यांनी पुरस्काराची घोषणा केली. ज्येष्ठ नेते शरद पवार व त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे.

गोरगरिबांच्या कल्याणासाठी, मागासवर्गीयांच्या उन्नतीसाठी आणि जातिअंतासाठी आयुष्यभर कार्य करणाऱ्या जोडप्यांना वंदन करण्यासाठी हा पुरस्कार देण्यात येणार आहे. प्रा. पाटील यांनी उभी हयात गोरगरिबांच्या प्रश्र्नांसाठी खर्ची घातली आहे. सरोज पाटील यांचेही सामाजिक व शैक्षणिक कार्य दखल घेण्यासारखे आहे. या पुरस्काराचे वितरण लवकरच करण्यात येणार असल्याचे गेडाम यांनी सांगितले.

(विश्वास पाटील)

Web Title: N.D. And Saroj Patil's 'Sharad-Pratibha' award