८१ प्रभागांत उमेदवार उभे करण्याचा राष्ट्रवादीचा निर्धार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:22 IST2020-12-24T04:22:36+5:302020-12-24T04:22:36+5:30
शिवाजी स्टेडियममधील शहर राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यालयात झालेल्या या बैठकीस मागच्या सभागृहातील बहुतांशी नगरसेवक यांच्यासह राजेश क्षीरसागर, सुनील पाटील, उत्तम ...

८१ प्रभागांत उमेदवार उभे करण्याचा राष्ट्रवादीचा निर्धार
शिवाजी स्टेडियममधील शहर राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यालयात झालेल्या या बैठकीस मागच्या सभागृहातील बहुतांशी नगरसेवक यांच्यासह राजेश क्षीरसागर, सुनील पाटील, उत्तम कोराणे, आदिल फरास उपस्थित होते. मागच्या निवडणुकीत दुसऱ्या स्थानावर राहिलेल्या काही उमेदवारांचीही उपस्थिती होती.
बैठकीत शहरातील सर्व ८१ प्रभागांत उमेदवार उभे करण्याचा तसेच जास्तीत जास्त उमेदवारांना निवडून आणण्याचा निर्धार करण्यात आला. मागच्या सभागृहातील नगरसेवकांच्या प्रभागात जेथे आरक्षण पडले आहे, त्या प्रवर्गातील उमेदवारांची नावे सुचविण्याचा अधिकार त्या-त्या माजी नगरसेवकांना द्यावा, त्या उमेदवारांना निवडून आणण्याची जबाबदारी आम्ही घेतो, असा ‘शब्द’ यावेळी देण्यात आला.
उद्या, शुक्रवारी राष्ट्रवादीचे नेते ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना भेटून बैठकीतील निर्णय त्यांच्या कानावर घालण्यात येणार आहे. आर. के. पोवार यांनी मुश्रीफ यांच्याशी या विषयावर चर्चा केली. त्यानुसार शुक्रवारी सायंकाळी भेटण्याचे ठरले.