शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Jayant Patil: प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी घेतली राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीचीच शाळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2022 18:56 IST

शहर व ग्रामीण अशा सात मतदारसंघातील कार्यकारणी, पदाधिकारी सेल यांचा आढावा घेतला.

कोल्हापूर : राष्ट्रवादीची परिवार संवाद यात्रा राज्यभर फिरून आता कोल्हापुरात आली आहे. कोल्हापुरात या यात्रेचा समारोप होणार आहे. शहरातील तपोवन मैदानात सायंकाळी ५ वाजता संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यास पक्षाचे अध्यक्ष शरद पवार मार्गदर्शन करणार आहेत. याआधीच कोल्हापुरात दाखल झालेले राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कार्यकारिणीचीच शाळा घेतली.जयंत पाटील यांनी हेडमास्तरची भूमिका घेत आज, गुरुवारी दुपारी शाहू स्मारक भवनमध्ये भरलेल्या राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेत कार्यकारिणीची चांगलीच हजेरी घेतली. खचाखच भरलेल्या सभागृहात हातात सेलनिहाय यादी घेऊन नावे वाचली आणि मोजली. यात महिला वगळता कायम निमंत्रितासह सर्व सेल नापास झाले. जिल्हा परिषद, महापालिका निवडणुकीआधी पक्ष बांधणीत संख्यात्मक आणि गुणात्मक सुधारणा करून राष्ट्रवादीला नंबर एकचा पक्ष बनवा, बुथनिहाय समित्या बळकट करण्याचा प्रेमळ सल्लाही दिला.शाहू स्मारक भवनमध्ये शहर व ग्रामीण अशा सात मतदारसंघातील कार्यकारणी, पदाधिकारी सेल यांचा आढावा घेतला. यावेळी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, आमदार अरुण लाड, जयमाला गायकवाड, सुलक्षणा सलगर, आर.के. पोवार, राजीव आवळे, मेहबूब शेख, रविकांत वरपे, सुनील गव्हाणे, अनिल साळाेखे उपस्थित होते.

(छाया-आदित्य वेल्हाळ)

टॅग्स :kolhapurकोल्हापूरNCPराष्ट्रवादी काँग्रेसJayant Patilजयंत पाटील