मुश्रीफ यांच्या वाढदिवसाला दिव्यांगांना राष्ट्रवादीतर्फे व्हिलचेअर प्रदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:24 IST2021-04-23T04:24:57+5:302021-04-23T04:24:57+5:30
कोल्हापूर : ग्रामविकास व कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांच्या वाढदिवसानिमित्त कोल्हापूर दक्षिण राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने सायबर चौक परिसरात विवीध समाजोपयोगी ...

मुश्रीफ यांच्या वाढदिवसाला दिव्यांगांना राष्ट्रवादीतर्फे व्हिलचेअर प्रदान
कोल्हापूर : ग्रामविकास व कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांच्या वाढदिवसानिमित्त कोल्हापूर दक्षिण राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने सायबर चौक परिसरात विवीध समाजोपयोगी कार्यक्रम घेण्यात आले. दिव्यांग गरीब मुलींना व्हिलचेअर प्रदान करण्यात आली. यावेळी संघटनेचे अध्यक्ष नितीन पाटील हे प्रमुख उपस्थित होते.
मंत्री मुश्रीफ यांचे लोकोपयोगी समाजकार्य अखंडपणे सुरू राहावे, त्यांना दीर्घायुष्य लाभावे यासाठी पक्षाच्यावतीने राजारामपुरी येथील हनुमान मंदिरात नितीन पाटील व कार्यकर्त्यांनी अभिषेक घातला. कार्यक्रमास महापालिका आरोग्य विभागाचे सफाई कामगार, घंटागाडी चालक, मदतनीस याशिवाय फळविक्रेते, भाजीपाला विक्रेते तसेच भागातील फेरीवाल्यांना तसेच विनामास्क फिरणाऱ्यांना मास्क व सॅनिटायझरचे वितरण करण्यात आले. कोरोनाचे निर्बंध पाळत व सोशल डिस्टन्सचा वापर करत हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमास फिरोज सौदागर, शिवाजीराव पाटील, सुरेंद्र माने दिलीप कलकुटकी, दीपक कश्यप, मुमताज बंधुवाले, सुप्रिया साळी, शिवाजी पाथरुठ, प्रवीण पाटील, पुष्परराज भोसले, शिवाजीराव माने, दीपक कलकुटगी, पुष्कराज पाटील, संभाजी भोसले तसेच दिव्यांग मुलगीही उपस्थित होते.
फोटो न. २३०४२०२१-कोल-बर्थडे मुश्रीफ
ओळी : कोल्हापूर दक्षिण राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने मंत्री हसन मुश्रीफ यांच्या वाढदिवसानिमित्त सायबर चौकात गरीब व दिव्यांग मुलीला व्हिल चेअर प्रदान करण्यात आली. यावेळी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
===Photopath===
220421\22kol_2_22042021_5.jpg
===Caption===
ओळी : कोल्हापूर दक्षिण राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने मंत्री हसन मुश्रीझ यांच्या बाढदिवसानिमीत्त सायबर चौकात गरीब व दिव्यांग मुलीला व्हिल चेअर प्रदान करण्यात आली. यावेळी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थीत होते.