शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

ईडीच्या छापेमारीनंतर हसन मुश्रीफ कोल्हापुरात, कार्यकर्त्यांची मोठी गर्दी; सोमय्यांच्या दौऱ्याबाबत म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2023 11:22 IST

जहाँगीर शेख कागल :  भाजप नेते किरीट सोमय्या कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनासाठी येणार आहेत. आनंदाची गोष्ट आहे. देवीमातेचे दर्शन घ्यावे, राजर्षी ...

जहाँगीर शेखकागल :  भाजप नेते किरीट सोमय्या कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनासाठी येणार आहेत. आनंदाची गोष्ट आहे. देवीमातेचे दर्शन घ्यावे, राजर्षी शाहुचे कोल्हापुर पहावे. माझ्या कामाबद्दलही माहिती घ्यावी. आमचा कोणीही कार्यकर्ता त्यांना रोखणार नाही असे स्पष्ट मत राष्ट्रवादीचे नेते, आमदार हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केले. ईडीच्या छापेमारीनंतर मुंबईहून ते कोल्हापुरात आले असता त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. मुश्रीफांना भेटण्यासाठी समर्थकांनी त्यांच्या निवासस्थानी मोठी गर्दी केली होती.यावेळी बोलताना आमदार मुश्रीफ म्हणाले की, मी काय आहे हे जनतेला माहित आहे. गेली पाच वर्षे मला घेरण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र काही हाती लागलेले नाही. ईडीचे अधिकारी बिचारे काय करणार? त्यांना कोणाचे तरी ऐकावे लागते. या मागे कोण आहे हे मी बोललो आहे. समरजित घाटगेंचा कार्यकर्ता दिपक मगर याला कसे चार दिवस आधी या कारवाईबद्दल कळाले? माझ्यावर प्रेम करणारी जनता व कार्यकर्ते दिवसभर उपाशी तापाशी थांबले. त्यांचे मी आभार व्यक्त करतो. असेही मुश्रीफ म्हणाले. बुधवारी (दि.११) सकाळच्या सुमारास मुश्रीफ यांच्या कागल येथील घरासह नातेवाईक, विश्वासू कार्यकर्ते आणि सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्यावर ईडीच्या पथकांनी छापे घातले. कोल्हापुरातील चार ठिकाणांसह पुण्यात तीन ठिकाणी दिवसभर कारवाई सुरू राहिली. सुमारे १२ ते १३ तास पथकाने सर्व कागदपत्रांची झाडाझडती घेतली. ईडीच्या या कारवाईवर संतप्त झालेल्या मुश्रीफ समर्थकांनी कोल्हापूरसह जिल्ह्यात विविध ठिकाणी निदर्शने करून राज्य आणि केंद्र सरकारचा निषेध केला होता.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरHasan Mushrifहसन मुश्रीफEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयKirit Somaiyaकिरीट सोमय्या