राष्ट्रवादीचा गुरुवारी नूतन कार्यालयात प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 04:20 IST2020-12-08T04:20:13+5:302020-12-08T04:20:13+5:30
राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून म्हणजेच १९९९ पासून जिल्हा कार्यालय हे ताराबाई पार्क येथील खाडे बिल्डिंगमध्ये होते. मात्र, राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्ष संगीता ...

राष्ट्रवादीचा गुरुवारी नूतन कार्यालयात प्रवेश
राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून म्हणजेच १९९९ पासून जिल्हा कार्यालय हे ताराबाई पार्क येथील खाडे बिल्डिंगमध्ये होते. मात्र, राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्ष संगीता खाडे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर कार्यालय तेथून हलवावे लागले. गेली वर्षभर कार्यालय जाधववाडी येथील पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष अनिल साळोखे यांच्या घरीच सुरू होते. पक्ष सत्तेत असतानाही हक्काचे कार्यालय नसल्याची खदखद पक्षाच्या कार्यकर्त्यांमधूनच व्यक्त होत होती. अखेर मंत्री मुश्रीफ यांनी कागल तालुका खरेदी-विक्री संघाच्या इमारतीत १ हजार चौरस फूट जागेत कार्यालय स्थलांतरीत करण्याचा निर्णय घेतला. गेली महिनाभर तेथे काम सुरू असून पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसादिवशी कार्यालयाचे उद्घाटन केले जाणार आहे.
सकाळी दहा ते अकरा या वेळेत शाहू सांस्कृतिक मंदिर, शाहू मार्केट यार्ड येथे शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम होणार आहे. अकरा ते दुपारी दोन या वेळेत पवार व्हिडिओ कॉन्फरन्सव्दारे कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत.
- राजाराम लोंढे