शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

जोतिबाच्या नवरात्रोत्सवास प्रारंभ, नागवेली पानातील महापुजा बांधून घटस्थापना

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2022 19:27 IST

नवरात्रोत्सवमध्ये दख्खनचा राजा श्री जोतिबाची वेगवेगळ्या सोहन कमल पाकळ्यांतील महापूजा बांधल्या जातात

दत्तात्रय धडेलजोतिबा : श्री जोतिबा देवाच्या नवरात्रोत्सवास आज, सोमवार पासून प्रारंभ झाला. जोतिबाची नागवेली पानातील महापुजा बांधून घटस्थापना करण्यात आली.नवरात्रोत्सवमध्ये दख्खनचा राजा श्री जोतिबाची वेगवेगळ्या सोहन कमल पाकळ्यांतील महापूजा बांधल्या जातात. त्या प्रत्येक पाकळीस महत्व आहे. पाच पाकळ्यांपैकी तीन पाकळ्या श्री जोतिबाचा त्रिदेवात्मक अवतार दर्शवितात. खालील दोन पाकळ्या कमळपुष्पाचे द्विदल आहे. हे मनातील सगुण व निर्गुण भावांचे प्रतीक आहे. श्री केदारनाथांनी, कमळभैरव नवरात्रोस्तव सोहळ्यात पूजेसाठी काशीहून सुवर्णकमळ आणून देत अशी आख्यायिका आहे. त्याच्या आधारे कपड्यांच्या रंगीत कमळ पाकळ्या करून या महापूजा बांधतात.आज, सोमवारी मंगलमय वातावरणात पहिल्या दिवशी तुतारी, ढोल, सनई, शिंग, ताशा या वाद्यांच्या निनादात मुख्य मंदिरात घटस्थापनेचा विधी होईल. सलग नऊ दिवस जोतिबा ते यमाई मंदिर मार्गावरून धुपारती सोहळा निघेल. रविवारी २ ऑक्टोबरला जोतिबाचा जागर होणार आहे. नवरात्र काळात जोतिबाचा जागर हा सातव्या दिवशी असतो. दोन लाख भाविक जागरा दिवशी डोंगरावर येतात. या दिवशी मंदिर चोवीस तास खुले असते.अंबारीतील वैशिष्ट्यपूर्ण महापूजाचार मुक्तीचे प्रतीक म्हणून जोतिबा देवाची सोहन कमलपुष्पातील दख्खनचा राजा रूपातील अलंकारीत बैठी महापूजा बांधण्यात येते. जगारानिमित्त मुख्य मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम होतात. ५ ऑक्टोबरला विजयादशमी दिवशी (दसरा) श्रींची अंबारीतील वैशिष्ट्यपूर्ण महापूजा बांधण्यात येते. ही पूजा वर्षातून एकदा बांधण्यात येते. सायंकाळी साडेपाच-सहा वाजता येथील दक्षिण दरवाजावर सीमोल्लंघनाचा सोहळा होतो. नवरात्रोस्तवाची सांगता जोतिबा डोंगरावर ललित सोहळ्याने होते. श्रींची गरुडारूढ अशी महापूजा बांधली जाते.चार महिने पोहाळे गावात वास्तव्यास असणारे जोतिबा देवाचे मानाचे उंट, घोडे जोतिबा डोंगरावर दाखल झाले आहे. मंदिर शिखरावर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे .

टॅग्स :kolhapurकोल्हापूरJyotiba TempleजोतिबाNavratriनवरात्री