शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

नवी मुंबई पोलिसांची कोल्हापुरात कारवाई; पाच अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 17:17 IST

Fraud Crime News Kolhapur-मुंबई महानगरपालिकेत तसेच इतर शासकीय सेवेत नोकरी लावतो म्हणून पैसे घेऊन तरुणांना सुमारे २० लाखांचा गंडा घातल्याच्या संशयावरुन नवी मुंबई पोलिसांनी कोल्हापूर जिल्ह्यातील पाचजणांना अटक केली. कारवाईसाठी नवी मुंबई पोलिसांना कोल्हापुरात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने सहकार्य केले.

ठळक मुद्दे नोकरीच्या आमिषाने मुंबईत युवकांना गंडा स्थानिक पोलिसांनी केले साहाय्य

कोल्हापूर : मुंबई महानगरपालिकेत तसेच इतर शासकीय सेवेत नोकरी लावतो म्हणून पैसे घेऊन तरुणांना सुमारे २० लाखांचा गंडा घातल्याच्या संशयावरुन नवी मुंबईपोलिसांनीकोल्हापूर जिल्ह्यातील पाचजणांना अटक केली. कारवाईसाठी नवी मुंबईपोलिसांना कोल्हापुरात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने सहकार्य केले.अटक केलेल्या संशयितांची नावे : संजय दिनकर गाडेकर (रा. बिरदेव वसाहत, कागल), भिकाजी हरी भोसले (कलंकवाडी, ता. राधानगरी), नामदेव रामचंद्र पाटील (वेतवडे, ता. पन्हाळा), जयसिंग शंकर पवार-पाटील (रा. खारघर, नवी मुंबई, मूळ गाव- शिरोली दुमाला, ता. करवीर), कृष्णात राजाराम शेटे (खारघर, नवी मुंबई, मूळ गाव- शिरोली दुमाला, ता. करवीर)मुंबई महानगरपालिकेत अगर इतर शासकीय कार्यालयांत नोकरी लावतो, असे सांगून बेरोजगार युवकांकडून लाखो रुपये घेऊन त्यांना नोकरी न लावता त्यांची फसवणूक केल्याचा गुन्हा नवी मुंबई पोलिसांत दाखल झाला आहे. त्याप्रकरणी फसवणूक झालेल्या पाच तरुणांनी पोलिसांत तक्रार दिली. त्यानुसार मुंबईतील काही युवकांना यापूर्वीच अटक केली आहे.

फसवणूक करणाऱ्यांच्या साखळीमध्ये कोल्हापुरातील काही युवकांचा सहभाग असल्याची माहितीही पोलीस तपासात पुढे आली. त्यानुसार शनिवारी नवी मुंबई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील, सहायक पोलीस निरीक्षक समीर चास्कर हे पोलीस पथकासह कोल्हापुरात दाखल झाले.

स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांची भेट घेऊन त्यांनी गुन्ह्याबाबत माहिती दिली. त्यानुसार त्यांच्या सहकार्याने पोलिसांनी पाच संशयितांना त्यांच्या घरातून अटक केली. पाचहीजणांना नवी मुंबईतील न्यायालयात हजर केले असता, त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली, अशी माहिती पो. नि. तानाजी सावंत यांनी दिली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजीPoliceपोलिसkolhapurकोल्हापूरNavi Mumbaiनवी मुंबई