नाथाजीराव पोवार यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:34 IST2020-12-30T04:34:34+5:302020-12-30T04:34:34+5:30

कोल्हापूर : येथील सामाजिक कार्यकर्ते नाथाजीराव दुलाजीराव पोवार (वय ७७, रा. आर. के.नगर) यांचे मंगळवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात ...

Nathajirao Powar passed away | नाथाजीराव पोवार यांचे निधन

नाथाजीराव पोवार यांचे निधन

कोल्हापूर : येथील सामाजिक कार्यकर्ते नाथाजीराव दुलाजीराव पोवार (वय ७७, रा. आर. के.नगर) यांचे मंगळवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी ऊर्मिला, मुलगा रवींद्र, मुली प्रिया, मेघा, जावई, सून, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन आज, बुधवारी आहे.

गेल्या महिन्याभरापासून पोवार यांना मधुमेहाचा त्रास अधिक जाणवू लागला. खासगी रुग्णालयातून उपचार घेऊन ते चार दिवसांपूर्वी घरी आले होते. मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. पंचगंगा स्मशानभूमी येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागातील अभियंता पदावरून निवृत्त झाल्यानंतर पोवार हे सामाजिक कार्यामध्ये अधिक सक्रिय झाले. शांत आणि अभ्यासू असे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते. अण्णा हजारे प्रणित भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलनाच्या जिल्हा उपाध्यक्ष आणि सचिवपदाची, तर आम आदमी पार्टीच्या जिल्हा सचिवपदाची जबाबदारी त्यांनी सांभाळली होती. कोल्हापूर हद्दवाढ कृती समितीच्या प्रवक्तेपदी, तर आर. के.नगर सोसायटी क्रमांक एकमध्येही ते कार्यरत होते. निवृत्तीनंतर त्यांनी पत्रकारितेचा अभ्यासक्रम पूर्ण केला होता.

फोटो (२९१२२०२०-कोल-नाथाजीराव पोवार (निधन)

Web Title: Nathajirao Powar passed away