शहरं
Join us  
Trending Stories
1
मुघलांच्या घोड्यांना संताजी, धनाजी दिसायचे तसे मोदींना ठाकरे, पवार दिसतात; राऊतांची टीका
2
Amit Shah : "केजरीवालांची जेलमध्ये हत्या होऊ शकते"; AAP च्या आरोपांवर काय म्हणाले अमित शाह?
3
"भारत महासत्ता बनतोय, आम्ही भीक मागतोय", पाकिस्तानच्या संसदेत भारताचे गोडवे
4
नाशिक: राऊड घाटात एसटीचा भीषण अपघात; ६ प्रवाशांचा मृत्यू, टायर फुटून ट्रकला धडकली
5
Amit Shah : "हे लोक कन्फ्यूज, यूपी सोडून पळून गेले"; अमित शाह यांचा राहुल-प्रियंका गांधींवर जोरदार हल्लाबोल
6
खासदार बनण्याचे स्वप्न; हरलो तर आमदार आहेच; उदयनराजे लोकसभेत बसणार की राज्यसभेतच राहणार?
7
Ravindra Waikar तिढा सुटला, उमेदवार ठरला! मुंबई उत्तर-पश्चिममध्ये रविंद्र वायकरच महायुतीचे उमेदवार
8
“भाजपा नेत्यांना मराठ्यांचा द्वेष, म्हणूनच PM मोदींना इतक्या सभा घ्याव्या लागतात”: मनोज जरांगे
9
‘कॉलर उडवताना सकाळ आहे की संध्याकाळ हे पाहावं लागतं’, शरद पवारांची उदयनराजेंवर बोचरी टीका 
10
Video - बापमाणूस! घटस्फोटानंतर वडिलांनी वाजत-गाजत लेकीला आणलं आपल्या घरी
11
प्रियांका गांधी लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत, सूत्रांची माहिती 
12
नवीन गुजरातचा आत्मा महाराष्ट्रात भटकतोय; संजय राऊतांचा भाजपावर पलटवार
13
१३९ दिवस शनी वक्री: ५ राशींना लॉटरी, वरदान काळ; गुंतवणुकीतून लाभ, पदोन्नती, पगारवाढ शक्य!
14
SRK ने लेकाला जोरात पकडलं अन्...! IPL दरम्यान शाहरुख-अबरामचं क्युट भांडण कॅमेऱ्यात कैद
15
इकडे आड, तिकडे विहीर! युद्ध रोखले तर नेतन्याहूंचे सरकार पडणार, नाही रोखले तर...
16
 ‘अमित शाह माझं पार्थिव उचलण्यास आले, तर खूप बरं होईल…’ दिग्विजय सिंह यांचं विधान चर्चेत  
17
पतंजलीला मोठा झटका, दृष्टी आय ड्रॉपसह 14 प्रोडक्ट्सवर बंदी, जाणून घ्या कारण
18
'माझिया प्रियाला प्रीत कळेना' विषयी अभिजीतचा मोठा खुलासा; म्हणाला, 'तुम्ही संधी दिली पण...'
19
शिंदेंच्या शिवसेनेचे तीन उमेदवार जाहीर होणार, रवींद्र वायकरांसह ही चार नावं चर्चेत
20
'पीके'मध्ये आमिर खाननं खरोखर दिले होते न्यूड सीन, अभिनेता म्हणाला - "जे गार्ड घातलं होतं ते पण..."

कोल्हापुरात शिवसेनेचे वस्त्रहरण करणार- नारायण राणे

By ऑनलाइन लोकमत | Published: December 07, 2017 8:59 PM

मालवण (सिंधुदुर्ग) : काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष या स्वतंत्र पक्षाची स्थापना करणारे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांची पक्ष स्थापनेनंतरची पहिलीच जाहीर सभा कोल्हापूर येथे शुक्रवार ८ रोजी होत आहे.

मालवण (सिंधुदुर्ग) : काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष या स्वतंत्र पक्षाची स्थापना करणारे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांची पक्ष स्थापनेनंतरची पहिलीच जाहीर सभा कोल्हापूर येथे शुक्रवार ८ रोजी होत आहे. या सभेकडे संपूर्ण महाराष्ट्र लक्ष लागून राहिले असतानाच सिंधुदुर्ग जिल्हा दौ-यावर असलेल्या राणे यांनी गुरुवारी मालवण येथे कोल्हापूर येथील सभेत आपला शिवसेनेवर थेट निशाणा असणार असल्याचे स्पष्ट केले.शिवाय सत्तेत बसलेल्या रंग बदलू शिवसेनेने आपल्या मुखपत्रातून अग्रलेख लिहिले. पक्षप्रमुखांनी ठिकठिकाणी सरकारविरोधी भाषणे ठोकली. मात्र सत्तेवर लाथ मारण्याची धमक त्यांच्यात नाही. त्यामुळे सत्तेसाठी लाचार असणा-या शिवसेनेचे वस्त्रहरण करणार असल्याचे सांगितले. मालवण येथील नीलरत्न निवासस्थानी राणे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी माजी खासदार निलेश राणे, स्वाभिमानचे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, मंदार केणी, अशोक सावंत, संदीप कुडतरकर, सुदेश आचरेकर, बाबा परब, ममता वराडकर, मोहन वराडकर, महानंदा खानोलकर, सहदेव बापर्डेकर, संजय लुडबे, राजू परुळेकर, राजू बिडये, आबा हडकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.शिवसेना सत्तेतून बाहेर पडायचे धाडस करत नसली तरी लवकरच १५ ते ३० आमदार बाहेर पडतील, असेही राणेंनी सांगत काँग्रेस पक्षातील आमदारही आता प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे ऐकत नसल्याचा हल्लाबोल केला.यावेळी राणे म्हणाले, १९९० साली मी आमदार झाल्यानतर देवबाग गावाला संरक्षक बंधारा बांधून दिला. मात्र या बंधा-याची दुरुस्ती तीन वर्षातील सत्ताधा-यांनी केली नाही. बंधा-याची डागडुजी करण्यात आली नसल्याने देवबाग येथील ग्रामस्थांच्या घरात पाणी घुसत आहेत. येथील मच्छीमार भयभीत झाले आहेत. याचे पालकमंत्री दीपक केसरकर व आमदार वैभव नाईक यांना सोयरसुतक नाही. याउलट ते देवबागला सीआरझेड लागू असल्याने बंधारा बांधून शकत नाही, असे अज्ञान प्रकट करून ग्रामस्थांची दिशाभूल करत आहेत.सीआरझेड भागात बंधारे बांधता येतात. त्यामुळे देवबाग गाव नैसर्गिक आपत्तीच्या विळख्यातून वाचविण्यासाठी खाडी व समुद्रात बंधारा बांधणे आवश्यक असून, याबाबत परिपूर्ण प्रस्ताव बनवून शासनाकडे पाठपुरावा केला जाणार आहे. तसेच ओकी वादळातील नुकसानग्रस्त मच्छिमारांना नुकसान भरपाई मीच मिळवून देणार आहे.भ्रष्टाचार बोकाळलाय, बेकारी वाढलीमी मंत्री असताना जिल्ह्यात विविध विकास प्रकल्प आणले. मात्र तीन वर्षे झाल्यानंतर सत्ताधिकारी ते प्रकल्प सुरू करू शकले नाहीत. स्थानिक युवकांना हजारो नोक-या उपलब्ध करून देणारे सी-वर्ल्ड, विमानतळ, रेडीबंदर, दोडामार्ग एमआयडीसी आदी प्रकल्प ठप्प केल्याने जिल्ह्यात बेकारी वाढली आहे. विकासाचे व्हिजन नसलेल्या लोकप्रतिनिधी जनतेची विकासाच्या नावाने दिशाभूल करत आहे. स्वत:च कामे घ्यायची. ठेकेदाराकडून पैसे उकळायचे अशी कामे करून लोकप्रतिनिधींनी जिल्ह्यात विकासकामे ठप्प करून भ्रष्टाचार बोकाळलाय आहे. ओखी वादळातील नुकसानग्रस्त मच्छीमारांना पुरावे दाखवून नुकसानभरपाई देण्याची माहिती दिली. मात्र, मी मंत्री असताना फयानच्यावेळी नुकसानग्रस्तांना सरसकट मदत केली होती.

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे kolhapurकोल्हापूर