शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

हसन मुश्रीफ यांनीच लोकसभेच्या रिंगणात उतरावे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत आग्रह 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2023 12:02 IST

अजित पवार चांगलेच भडकले

काेल्हापूर : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून आमदार हसन मुश्रीफ, माजी आमदार के. पी. पाटील व उद्योगपती व्ही. बी. पाटील यांच्या नावांची चर्चा राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत झाली. हातकणंगलेतून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे नावही बैठकीत पुढे आले असून, जिल्हा बँकेचे संचालक रणवीर गायकवाड हेही इच्छुक आहेत.लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी मतदारसंघनिहाय आढावा घेतला. यावेळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, हसन मुश्रीफ आदी उपस्थित होते. कोल्हापुरातून कोण इच्छुक असल्याबाबत विचारले असता, हसन मुश्रीफ हेच योग्य असून, सर्वपक्षीय नेते त्यांना मदत करु शकतात, असे आर. के. पोवार, ए. वाय. पाटील आदींनी सांगितले. ते नाही म्हटले तर के. पी. पाटील, व्ही. बी. पाटील हा पर्याय असू शकतो. ‘व्ही. बी’ यांना छत्रपती घराण्याचे पाठबळ मिळू शकते. हातकणंगलेतून जयंत पाटील यांना उमेदवारी दिल्यास ते विजयी होऊ शकतात, असे बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर यांनी सुचविले. यावर योग्य नाव सुचवल्याचे अजित पवार यांनी सांगितले. रणवीर गायकवाडही येथून इच्छुक असल्याचे हसन मुश्रीफ यांनी सांगितले.‘उसन्या’मुळे पक्षाचे नुकसानगेल्या तीन निवडणुकीत उसने उमेदवार उभे केल्याने पक्षाचे खूप मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे आता पक्षात काम करणाऱ्यांनाच संधी द्या, अशी मागणी सर्वच पदाधिकाऱ्यांनी केली.

उमेदवार आहे, पण शिवसेनेचा आहेसर्वच पदाधिकारी हसन मुश्रीफ यांच्या नावावर आग्रह होते. याबाबत त्यांनाच विचारले असता, अजून एक विधानसभेची निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले. मग, उमेदवार कोण? अशी विचारणा अजित पवार यांनी केली, यावर, उमेदवार आहे पण ते शिवसेनेत आहेत, असे अप्रत्यक्ष संजय घाटगे यांचे नाव सूचित केले.

कोल्हापूर’ची जागा सुटू शकते‘कोल्हापूर’ व ‘हातकणंगले’ वरील शिवसेनेने दावा केला असला तरी सध्या त्यांच्याकडे ते खासदार नाहीत. कोल्हापुरातील राजकीय स्थिती पाहिली तर ही जागा सुटू शकते, अशी चर्चा बैठकीत झाली.

दादा पुन्हा भडकलेकोल्हापूर शहरात पक्षाचे २५ नगरसेवकांहून १५ वर आले, आता काय अवस्था आहे. जिल्ह्यातही वाईट अवस्था असल्याने अजित पवार हे चांगलेच भडकले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरNCPराष्ट्रवादी काँग्रेसlok sabhaलोकसभाHasan Mushrifहसन मुश्रीफJayant Patilजयंत पाटील