शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
2
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
3
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
4
Top Marathi News Live: उत्तर महाराष्ट्र अन् मराठवाड्याला 'हीट वेव्ह'चा इशारा; मुंबईसह उत्तर कोकणात उकाडा असह्य होणार
5
अनिल अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर ४८% नं वधारला; ३० रुपयांच्या वर पोहोचला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
6
३४९,३९९ चे रिचार्ज नाही, २० रुपयांचा बॅलन्स तुमचे सिम कार्ड ठेवणार अॅक्टिव्ह...! ट्रायने सर्वच कंपन्यांना घालून दिलाय हा नियम...
7
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
8
Watch Video: टिम डेव्हिड, रोमारियो शेफर्ड यांनी चाहत्यांसोबत खेळलं 'गल्ली क्रिकेट', व्हिडीओ व्हायरल!
9
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
10
'चला हवा येऊ द्या'च्या दुसऱ्या सीझनमध्ये परत तीच टीम का नव्हती? श्रेया बुगडे म्हणाली...
11
बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु
12
Swapna Shastra: भीतीदायक स्वप्नांचा असतो भविष्याशी संबंध? नक्की काय सांगतं स्वप्न शास्त्र?
13
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
14
Ilma Afroz : वडिलांचं छत्र हरपलं, शेतात घाम गाळला; आईने पणाला लावलं आयुष्य, लेक झाली IPS अधिकारी
15
"आज सासऱ्यांना मिस करतेय, रिंकूची खेळी त्यांच्यासाठी होती"; KKR जिंकल्यावर प्रिया सरोज भावूक
16
बर्थडे पार्टीत रक्ताचा सडा! चेहऱ्याला केक लावल्याच्या रागातून भाजप नेत्याच्या भावांसह तिघांची हत्या
17
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
18
Home Loan घेण्यासाठी किमान किती असावा लागेल Credit Score; अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी
19
आपच्या त्या सात फुटीर खासदारांबाबत राज्यसभा सभापतींनी घेतला मोठा निर्णय, विलिनिकरणाबाबत दिले असे आदेश    
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर - रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गाचे रेखांकन बदलण्यास भाग पाडू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:25 IST

कोपार्डे : नागपूर - रत्नागिरी राष्ट्रीय महामार्ग करवीर तालुक्यातील शिये - पळवाडीतून जाणार असून, यामुळे शेतकरी व ग्रामस्थांचे ...

कोपार्डे : नागपूर - रत्नागिरी राष्ट्रीय महामार्ग करवीर तालुक्यातील शिये - पळवाडीतून जाणार असून, यामुळे शेतकरी व ग्रामस्थांचे मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळे या महामार्गाच्या पर्यायी रेखांकनासाठी राष्ट्रीय महामार्ग विभागाला भाग पाडू, असे आश्वासन खासदार संभाजीराजे यांनी दिले. शिये व भुये येथील शेतकरी व ग्रामस्थांच्या कृती समितीने खा. संभाजीराजे यांची भेट घेऊन आपल्या व्यथा मांडल्या. यावेळी राजेंद्र पाटील, पंचायत समितीचे सदस्य कृष्णात पोवार उपस्थित होते. महापुरावेळी या महामार्गाच्या प्रस्तावित रेखांकन परिसरात दोन किलोमीटरपर्यंत पाणी आले होते. भविष्यात जर या महामार्गासाठी भराव टाकला तर कोल्हापूर शहर व लगतच्या गावांना पुराचा मोठा धोका निर्माण होणार आहे. या महामार्गामुळे चारशे शेतकऱ्यांची ३५० एकर सुपीक जमीन राष्ट्रीय महामार्ग संपादित करणार असल्याने येथील बहुतांश शेतकरी हे भूमिहीन व बेरोजगार होणार आहेत. त्यामुळे या महामार्गासाठी सध्याच्या रेखांकनाप्रमाणे होणारे भूसंपादन थांबवून पूर्वीच्या रेखांकनानुसार भूसंपादन करावे, अशी मागणी संभाजीराजे यांच्याकडे करण्यात आली. यावेळी बाजीराव पाटील, अभिजीत पाटील, राजेश पाटील, जयसिंग पाटील उपस्थित होते.

220921\img-20210921-wa0118.jpg

करवीर तालुक्यातील शिये भुये दरम्यानच्या सध्याचे भूसंपादन थांबवून पुर्वीच्या रेखांकनानुसार करण्याच्या मागणीचे निवेदन खा. संभाजी राजे यांना कृती समितीने दिले यावेळी राजेंद्र पाटील कृष्णात पोवार व इतर