शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

नागपंचमी विशेष: दिसला साप की ठेचा डोकं, असं कशाला? 

By संदीप आडनाईक | Updated: July 29, 2025 13:59 IST

हा आरोग्याचा सण आहे, हे जाणून घेतले पाहिजे.

संदीप आडनाईक कोल्हापूर : समाजात साप या सरपटणाऱ्या वन्यप्राण्याविषयी अनेक गैरसमजुती आहेत. बिनविषारी सापांना विषारी समजून मारले जाणे, साप डूख धरतो अशा अंधश्रद्धांमुळे किडकं, लांबडं, जनावर असे संबोधून समोर साप दिसला की घ्या काठी अन् ठेचा डोकं या मानसिकतेमुळे शेतकऱ्यांचा मित्र असणाऱ्या सापाकडे शत्रू म्हणून पाहिले जात आहे; पण नागपंचमीनिमित्ताने गोडधोड केले जाते, त्यामुळे हा आरोग्याचा सण आहे, हे जाणून घेतले पाहिजे.नागपंचमीला सर्वांचे विशेषत: महिलांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी चांगल्या प्रथा आहेत, त्याचे पालन केले पाहिजे. या दिवशी लाह्यांचा नैवेद्य दिला जातो. घरात कोणताही पदार्थ चिरणे, भाजणे, कापणे आणि तळणे वर्ज्य असते, जमीन खणत नाहीत. कोकणात गोमाटीच्या वेलीचीही पूजा केली जाते. गोमाटी, राजीगरा यांसारख्या रानभाज्यांचे पदार्थ केले जातात.

चंदगड भागात दिवाळीसारखा फराळ केला जातो. यामागे आरोग्य जपण्याचा हेतू आहे. शिवाय साप हे शीतरक्ताचे सजीव आहेत, त्यामुळे त्यांना स्वतःच्या शरीराचे तापमान स्वतः नियंत्रित करता येत नाही. तो मांसाहारी सजीव आहे. त्यामुळे तो दूध पीत नाही.कुंभार समाजाचा पुढाकारनागपंचमीचे महत्त्व व पूर्वपरंपरा आजही ग्रामीण भागात मोठी आहे. कुंभार समाज पारंपरिक पद्धतीने पाच व सातफड्यांचे मातीचे नाग पूजेसाठी उत्तमरीत्या बनवीत असतात. परंतु, वास्तवात असे नाग नसतात, याची जनजागृती निसर्गमित्र संस्थेने सात वर्षांपासून केली. त्यांना पटवून दिल्यामुळे आता एक फड्याचे मातीचे नाग कुंभार समाज विक्रीसाठी ठेवत आहे. शाहूपुरीतील मंगल पुरेकर यांनी या नागपंचमीनिमित्त तब्बल १००० मातीचे एकफड्याचे नाग तयार केले आणि ते विकले जात आहेत.

चंदगड भागात नागपंचमीला भाजलेले पदार्थ केले जातात. कापणे, चिरणे, जाळले जात नाहीत. कोणत्याही सजीवाला इजा केली जात नाही. भाजणी, राजीगरा, चिरमुरे, खोबरे, रवा आणि कडक लाडवांचा, लाह्यांचा आणि फळांचा आहारात समावेश असतो. २१ दिवस दिवाळीसारखे फराळ केले जातात. कोणत्याही यंत्राचा वापर केला जात नाही. - शोभा तळसंदेकर, चंदगड.अंधश्रद्धा दूर करण्यासाठी आता कुंभार समाजातील काहीजणांनी पुढाकार घेतला आहे. ही अंधश्रद्धा दूर करण्यासाठी आता कुंभार समाजातील काहीजणांनी पुढाकार घेतला आहे. - अनिल चौगुले, निसर्गप्रेमी.