न्यू कॉलेजमध्ये नॅक मूल्यांकन सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:22 IST2021-03-24T04:22:49+5:302021-03-24T04:22:49+5:30
‘रोट्रॅक्ट क्लब’तर्फे रक्तदान शिबिर कोल्हापूर : रोट्रॅक्ट क्लब ऑफ कोल्हापूर आणि रोटरी क्लब ऑफ कोल्हापूरतर्फे कोरोना नियमांचे पालन करत ...

न्यू कॉलेजमध्ये नॅक मूल्यांकन सुरू
‘रोट्रॅक्ट क्लब’तर्फे रक्तदान शिबिर
कोल्हापूर : रोट्रॅक्ट क्लब ऑफ कोल्हापूर आणि रोटरी क्लब ऑफ कोल्हापूरतर्फे कोरोना नियमांचे पालन करत दि. १३ मार्चला दोन ठिकाणी रक्तदान शिबिर घेण्यात आले. त्याला चांगला प्रतिसाद लाभला. त्यासाठी शाहू ब्लड बँक, वैभव लक्ष्मी ब्लड बँक, एमएमए मॅट्रिक्स, ध्रुव मोदी, मृणाल शिंदे, आदींचे सहकार्य, तर साहिल गांधी, अथर्व धनाल यांचे मार्गदर्शन लाभले, अशी माहिती ‘रोट्रॅक्ट क्लब’चे अध्यक्ष अभिजित पाटील आणि सचिव मानव गुळवणी यांनी दिली.
तारुण्याच्या उंबरठ्यावर परिसंवाद
कोल्हापूर : येथील अवनि संस्थेच्यावतीने जिल्ह्यातील विविध सात शाळांमध्ये लिंग भाव समानता व समानतेसाठी कृती उपक्रम राबविण्यात येत आहे. याअंतर्गत ‘तारुण्याच्या उंबरठ्यावर’ या विषयावरील परिसंवाद सोमवारपासून घेण्यात येणार आहे. शनिवार (दि.२७) पर्यंत राबविण्यात येईल. त्यामध्ये ४७६ मुले, मुली सहभागी होणार आहेत.
अभियांत्रिकी विद्यार्थ्यांची अभ्यासपूर्व भेट
कोल्हापूर : येथील भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांनी एलिक्झा पार्क या बांधकाम प्रकल्पास अभ्यासपूर्व भेट दिली. त्यांना अजयसिंह देसाई, मनोज खाडे यांनी बांधकामाची माहिती दिली. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचे निरसन केले. प्रा. नितीश मोहिते यांनी आभार मानले. या अभ्यासपूर्व भेटीसाठी प्राचार्य डॉ. व्ही. आर. घोरपडे, विभागप्रमुख प्रा. व्ही. एस. कदम यांचे मार्गदर्शन लाभले.