शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: तुटलेल्या वीजेच्या तारेला स्पर्श झाल्याने मायलेकरांचा जागीच मृत्यू, पन्हाळा तालुक्यातील दुर्दैवी घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2023 16:22 IST

मुलाला बघायला आई शेताकडे गेली अन्...

सरदार चौगुले पोर्ले तर्फ ठाणे : शेतात तुटलेल्या वीजेच्या तारेला स्पर्श झाल्याने मायलेकरांचा जागीच मृत्यू झाला. पन्हाळा तालुक्यातील नेबापूर येथे आज, गुरुवारी सकाळच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. अजय गुंगा मगदून (वय ३०), नंदा गुंगा मगदूम (४९, दोघेही, रा.मंगळवार पेठ ता.पन्हाळा) अशी मृतांची नावे आहेत. आषाढी एकादशीदिवशीच ही दुर्घटना घटल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत होती. घटनेची नोंद पन्हाळा पोलिस ठाण्यात झाली.घटनास्थळ, पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, नेबापूर येथील जमदाडकी नावाच्या शेतात भात लागणीसाठी टाकलेल्या रोपाला अजय खत टाकण्यासाठी गेले होते. खत टाकत असताना शेतात तुटून पडलेल्या वीजेच्या तारेला अजयच्या पायाला स्पर्श झाला. यावेळी विजेच्या धक्क्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अजय बराच वेळ घरी न आल्याने व फोन बंद असल्याने आई नंदा शेताकडे गेल्या. यावेळी अजय शेताच्या बांधावर पडलेला दिसला. त्याच्या अंगावर पडलेली वीजेची तार बघून आईने आरडाओरडा केला. अन् मुलाच्या अंगावरील विद्युत तार बाजूला करताना विजेचा धक्का बसल्याने त्यांचाही जागीच मृत्यू झाला. आवाज ऐकून गावातील लोक येईपर्यंत दोघांचा मृत्यू झाला होता. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरelectricityवीजDeathमृत्यू