माझं गडहिंग्लज..माझा अभिमान बोधचिन्हाचे अनावरण उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 18:58 IST2021-07-14T18:55:23+5:302021-07-14T18:58:20+5:30
MuncipaltyCarportaion Kolhapur : माझं गडहिंग्लज, माझा अभियान या येथील दसरा चौकात नगरपालिकेतर्फे बसविण्यात आलेल्या बोधचिन्हाचे अनावरण उत्साहात पार पडले. नगराध्यक्षा प्रा. स्वाती कोरी यांनी फित कापून या बोधचिन्हाचे अनावरण केले.

गडहिंग्लज बसस्थानकासमोरील दसरा चौकात नगरपालिकेतर्फे बसविण्यात आलेल्या बोधचिन्हाचे अनावरण नगराध्यक्षा प्रा. स्वाती कोरी यांच्याहस्ते झाले. यावेळी उपनगराध्यक्ष महेश कोरी, पक्षप्रतोद बसवराज खणगावे, मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर, पाणी पुरवठा अभियंता अनिल गंदमवाउ व नगरसेवक उपस्थित होते.
गडहिंग्लज : माझं गडहिंग्लज, माझा अभियान या येथील दसरा चौकात नगरपालिकेतर्फे बसविण्यात आलेल्या बोधचिन्हाचे अनावरण उत्साहात पार पडले. नगराध्यक्षा प्रा. स्वाती कोरी यांनी फित कापून या बोधचिन्हाचे अनावरण केले.
नगराध्यक्षा प्रा. कोरी म्हणाल्या, सर्व सहकारी नगरसेवक, अधिकारी व कर्मचारी यांचे अथक परिश्रम आणि शहरातील सूज नागरिकांच्या पाठबळामुळेच गडहिंग्लज नगरपालिकेला स्वच्छ भारत अभियानात देशपातळीवर उज्वल यश मिळाले. माझी वसुंधरा स्पर्धेत गडहिंग्लज नगरपालिका राज्यात ३४ वी तर जिल्ह्यात दुसरी आली आहे.
शहरातील नागरिकांसाठी ठिकठिकाणी ओपन जीम सुरू करण्यात आले आहेत. साने गुरूजी वाचनालयासमोर आय लव्ह गडहिंग्लज तर बसस्थानकासमोर माझ गडहिंग्लज माझा अभिमान हे बोधचिन्हे बसविण्यात आली आहेत. त्यामुळे शहराच्या सौंदर्यात भर पडली आहे.
यावेळी उपनगराध्यक्ष महेश कोरी, पक्षप्रतोद बसवराज खणगावे, मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर, नगरसेवक नरेंद्र भद्रापूर, राजेश बोरगावे, उदय कदम, प्रकाश मोरे, नगरसेविका सुनिता पाटील, शकुंतला हातरोटे, शशीकला पाटील, क्रांतीदेवी शिवणे, सागर पाटील, किरण कापसे, नगर पाणी पुरवठा अभियंता अनिल गंदमवाड, लेखापाल शशीकांत मोहिते आदींसह अधिकारी, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.