कोल्हापूर : माझ्या खासदारपदाची मुदत तीन मे रोजी संपणार आहे. त्यानंतर माझी निश्चितपणे वेगळी दिशा असणार आहे. तोपर्यंत वेट अँड वॉच अशी माझी भूमिका राहणार असल्याचे खासदार संभाजीराजे यांनी सांगितले. कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज, मंगळवारी त्यांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली.यावेळी संभाजीराजे म्हणाले, मतदान करणे सर्वांचा अधिकार आहे. बराच विचार करून मी आज मतदान केले. त्यासाठी मला ३० सेकंदांचा वेळ लागला. सर्वसामान्य, गरीबांसाठी मी नेहमी संघर्ष असतो. त्याअंतर्गत मी उपोषण केले. सामाजिक क्षेत्रात माझे प्रामाणिकपणे काम सुरू आहे. त्यावर कुणी, काय, बोलावे, कोणती भूमिका घ्यावी यावर मला भाष्य करायचे नसल्याचे त्यांनी सांगितले. खासदारपदाची मुदत संपल्यानंतर माझी निश्चितपणे वेगळी दिशा राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
Sambhajiraje Chhatrapati: खासदार संभाजीराजे म्हणाले, तीन मे नंतर माझी वेगळी दिशा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2022 13:50 IST