गोरगरिबांना न्याय देणारी मुश्रीफ यांच्या कामाची पद्धत : उदयनराजे भोसले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 13:54 IST2021-06-23T13:53:54+5:302021-06-23T13:54:27+5:30
UdayanrajeBhosle HasanMusrif Kolhapur : राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची काम करण्याची वेगळी स्टाईल आहे. आतापर्यंत त्यांनी सामान्य, गोरगरीब माणूस केंद्रबिंदू मानून काम करत त्यांना न्याय देण्याची भूमिका घेतल्याचे गौरवोद्गार खासदार उदयनराजे भोसले यांनी काढले.

खासदार उदयनराजे भोसले यांनी सार्वजनिक कामासाठी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या मुंबईतील निवासस्थानी मंगळवारी भेट घेतली. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक भैय्या माने उपस्थित होते.
ठळक मुद्देगोरगरिबांना न्याय देणारी मुश्रीफ यांच्या कामाची पद्धत : उदयनराजे भोसले
कोल्हापूर : राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची काम करण्याची वेगळी स्टाईल आहे. आतापर्यंत त्यांनी सामान्य, गोरगरीब माणूस केंद्रबिंदू मानून काम करत त्यांना न्याय देण्याची भूमिका घेतल्याचे गौरवोद्गार खासदार उदयनराजे भोसले यांनी काढले.
खासदार उदयनराजे भोसले हे सार्वजनिक कामाच्या निमित्ताने मंगळवारी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या मुंबईतील निवासस्थानी भेट दिली. यावेळी खासदार भोसले व मंत्री मुश्रीफ यांच्यात बराच वेळ चर्चा झाली. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक भैय्या माने उपस्थित होते.