मुश्रीफ यांचा शाप म्हणजे विषारी नागाचा फुत्कार : महाडिक यांचा पलटवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2018 13:11 IST2018-09-25T12:49:46+5:302018-09-25T13:11:56+5:30
आमदार हसन मुश्रीफ यांनी दिलेला शाप म्हणजे विषारी नागाचा फुत्कार आहे..त्या शापाने माझी भरभराटच होणार आहे..आणि येत्या निवडणुकीत महाडिक नव्हे तर मुश्रीफ हेच राजकारणातून हद्दपार होणार आहेत असा पलटवार मंगळवारी माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी केला.

मुश्रीफ यांचा शाप म्हणजे विषारी नागाचा फुत्कार : महाडिक यांचा पलटवार
कोल्हापूर : आमदार हसन मुश्रीफ यांनी दिलेला शाप म्हणजे विषारी नागाचा फुत्कार आहे..त्या शापाने माझी भरभराटच होणार आहे..आणि येत्या निवडणुकीत महाडिक नव्हे तर मुश्रीफ हेच राजकारणातून हद्दपार होणार आहेत असा पलटवार मंगळवारी माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी केला.
मुश्रीफ यांच्या मुलांकडून एमआयडीसीमध्ये विम्याच्या नावाखाली लुबाडणूक सुरू असल्याचा आरोपही महाडिक यांनी केला..गोकूळ मल्टिस्टेट च्या मुद्द्यांवर मुश्रीफ-सतेज पाटील यांना एका व्यासपीठावर येण्याचे आव्हान महाडिक यांनी दिले..त्यामुळे आता महाडिक विरुद्ध सतेज पाटील हा वाद महाडिक विरुद्ध मुश्रीफ-सतेज पाटील असा पेटणार आहे.
मुश्रीफ यांनी बळ दिल्यानेच सतेज पाटील विधान परिषद निवडणुकीत विजयी झाले आणि आपला पराभव झाला ही खदखद महाडिक यांच्या मनांत आहे..ते ही एक कारण या टिकेमागे आहे.