शहरं
Join us  
Trending Stories
1
Tejas Fighter Jet Crashed : भारताचे लढाऊ विमान तेजस कोसळले, दुबई एअर शो दरम्यान मोठी दुर्घटना; अपघात कॅमेऱ्यात कैद
2
मोठी बातमी! इस्रायलचे पंतप्रधान बेजामिन नेतान्याहून भारत दौऱ्यावर येणार, जुनी दोस्ती आणखी घट्ट होणार
3
ना थांबा, ना विश्रांती… गरुडाचा ६१०० किलोमीटर प्रवास थक्क करणारा; आशियातून आफ्रिकेत ६ दिवसांत पोहोचला
4
'माझ्याकडून हे SIR चे काम होणार नाही...' गुजरातमध्ये बीएलओ शिक्षकाने आयुष्य संपविले, देशातील आठवा...
5
BSNL ने किंमत न वाढवताही प्लॅन्स केले महाग; 'या' लोकप्रिय रिचार्ज प्लॅन्सची व्हॅलिडिटी घटवली!
6
टाटा-बजाजसह 'हे' शेअर्स आपटले; फक्त एकाच क्षेत्रात वाढ, गुंतवणूकदारांचे ₹४.३० लाख कोटी पाण्यात!
7
बर्फ, दलदल, वाळवंट अन् पाणी..; कुठेही चालण्यास सक्षम, भारतीय सैन्याला मिळणार BvS10 सिंधू आर्मर्ड व्हेईकल
8
Malegaon Dongrale: चिमुकलीवर अत्याचार, लोकांच्या संतापाचा कडेलोट; थेट न्यायालयात शिरण्याचा प्रयत्न, पोलिसांचा लाठीचार्ज
9
"तेव्हा कुणी आलं नाही, आता स्टंटबाजी करायला आले, पण मी मारहाण...", भाजपच्या माजी नगरसेवकांने सांगितलं काय घडलं?
10
सावधान! क्रोम युजर्सना मोठा धोका, गुगलने जारी केली सिक्योरिटी वार्निंग, वेळीच व्हा अलर्ट
11
VIDEO: क्रिकेटच्या पिचवर पडली विकेट! पलाशनं कायम 'स्मृती'त राहिल असं केलं हटके प्रपोज
12
कर्नाटक सरकारमध्ये बदल होणार! डीके शिवकुमार यांच्या समर्थकांच्या हालचाली वाढल्या, काही आमदार दिल्लीत तळ ठोकून
13
उपमुख्यमंत्रिपदाची मागणी का केली नाही? चिराग म्हणाले- मी लालची नाही; मिळाले त्यात समाधानी
14
करिश्मा कपूरनं मुंबईतील १ फ्लॅट भाड्याने दिला; दर महिन्याला किती होणार कमाई? वाचा
15
'नवीन भाडे करार २०२५' : अ‍ॅडव्हान्स म्हणून घेता येईल फक्त २ महिन्यांचे भाडे; घरमालक वाढवू शकणार नाही मनमानी पद्धतीनं भाडं
16
लुटेरी दुल्हन! वय २४ वर्षे अन् केली १५ लग्न; ५२ लाखांचा गंडा, नवऱ्याला सोडून जाते पळून अन्...
17
अरे बापरे सेम टू सेम! हुबेहुब आलिया भटसारखी दिसते ही मराठी अभिनेत्री, फोटो पाहून चक्रावून जाल
18
३ वर्षांचे प्रेमसंबंध आणि लग्न करायला नकार! रागाच्या भरात प्रियकर झाला मारेकरी; दोन वेळा गोळ्या झाडल्या पण... 
19
दिल्ली स्फोट प्रकरणी मोठा खुलासा! 'घरघंटी'च्या मदतीने बनवले होते बॉम्ब; साहित्य जप्त केले
20
IND vs SA 2nd Test: 'आमचं ठरलंय!' गिलच्या जागी कोण? कॅप्टन पंतनं उत्तर दिलं, पण...
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: ईडी आणि प्रॉपर्टीतून मुश्रीफ-समरजित यांचे डिल, संजय मंडलिक यांचे खळबळजनक भाष्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2025 15:45 IST

'आमच्या महिला उमेदवाराला आर्थिक आमिष दाखवून दबावाने माघार घ्यायला लावली'

कोल्हापूर : हसन मुश्रीफ यांना ईडीतून वाचण्यासाठी आणि समरजित घाटगे यांच्या कागलमधील वाड्याच्या जागेवरील आरक्षण उठविण्यासाठी या दोघांची युती झाली आहे. कुणी राजकीय युती, कोणी तालुक्याच्या विकासासाठी युती आणि कोणी पुढच्या तडजोडीसाठी युती असे म्हणत असले तरी ईडी आणि प्राॅपर्टीतून हे डिल झाल्याचा खळबळजनक आरोप माजी खासदार संजय मंडलिक यांनी केला आहे. ते येथे पत्रकारांशी बोलत होते.मंडलिक म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यातील जनता कोणालाही एकाकी पडू देत नाही. सदाशिवराव मंडलिक, राजू शेट्टी ही त्याची उदाहरणे आहेत. सकाळपासून १०० जणांचे फोन आले की कोणत्याही परिस्थितीत माघार घेऊ नका. आम्ही तुमच्यासोबत आहोत. कारण आम्ही दोन, तीन जागा घेऊन माघार घेणार असल्याच्या अफवा उठवल्या जात आहेत. परंतु आमचा अपमान झालाय. आम्ही तुमच्यासोबत आहोत अशा भावना कागलचे नागरिक व्यक्त करत आहेत.

मी तर मंडलिकांचा मुलगा आहेया जिल्ह्यातील आमदारही आम्ही सदाशिवराव मंडलिक यांच्यापासून प्रेरणा घेऊन राजकीय संघर्ष करत असल्याचे नेहमी सांगत असतात. मी तर त्यांचा मुलगा आहे. एकतर मी कोणाच्या कधी फाटक्यात पाय घालत नाही. पण संघर्ष आमच्या पाचवीलाच पूजला आहे. पण आता ही वेळ आली आहे. त्यामुळे आम्ही लढायला तयार आहोत, असे मंडलिक यांनी सांगितले.

उमेदवार सुरक्षितस्थळीवास्तविक अर्ज भरल्यानंतर उमेदवाराला प्रचार करायची उत्सुकता असते. परंतु आम्ही आमचे उमेदवार सहलीवर नव्हे तर सुरक्षितस्थळी पाठविले आहेत. कारण आमच्या एक महिला उमेदवार बाहेर जायचे म्हणून कपडे आणण्यासाठी घरी गेल्या तर त्यांना आर्थिक आमिष दाखवून किंवा दबावाने माघार घ्यायला लावली. आमचे उमेदवार सर्वसामान्य कार्यकर्ते आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कोणताही दबाव येऊ नये म्हणून आम्ही ही खबरदार घेतल्याचे मंडलिक यांनी सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : Mushrif-Samarjit deal via ED and property: Mandaliks sensational claim

Web Summary : Sanjay Mandlik alleges Mushrif and Samarjit colluded to evade ED scrutiny and lift property reservations. He claims citizens support him despite rumors of backing down. Candidates are secured due to pressure tactics.