शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Kolhapur: जुनं ते सोनं!, पाडळीत दुर्मिळ वस्तूंचे संग्रहालय 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2024 17:46 IST

आयुब मुल्ला खोची: विविध प्रकारच्या सुमारे सव्वाशे दुर्मिळ वस्तूंचे जतन करीत इतिहास परंपरा संस्कृती सांगणारे वस्तूंचे संग्रहालय पाडळी (ता.हातकणंगले) ...

आयुब मुल्लाखोची: विविध प्रकारच्या सुमारे सव्वाशे दुर्मिळ वस्तूंचे जतन करीत इतिहास परंपरा संस्कृती सांगणारे वस्तूंचे संग्रहालय पाडळी (ता.हातकणंगले) येथे स्थापन केले आहे. अंबप हायस्कूलचे शिक्षक विनायक गुरव यांनी प्रचंड परिश्रमातून जिज्ञासूवृत्तीने नव्या पिढीला जुना काळ वस्तूंच्या रुपात कळावा यादृष्टीने या संग्रहालयाची निर्मिती केली आहे. नऊ वर्षापासून वस्तू संकलनाचे काम त्यांनी सुरू ठेवले आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील आतापर्यंत सुमारे एक हजार विद्यार्थ्यांनी येथे भेट दिली आहे.ग्रामीण भागात अशी संग्रहालय निर्माण करणे आणि त्याचे स्वरूप वाढवीत ठेवणे हे नव्या पिढीला माहिती मिळण्याचे मोठे केंद्रच म्हणावे लागेल. नोकरी सांभाळत गुरव यांनी वस्तू जमविण्याचा छंद जोपासने सध्याच्या काळात समजोयोगी आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात मानवी श्रमाचा वापर कमी होवून यंत्राचा वापर वाढला आहे. अशा परिस्थितीत सध्याच्या पिढीला आई वडील, आजोबा, पणजोबा यांच्या काळात किंबहुना त्याही पूर्वीच्या काळात जगण्याची पद्धत आणि साधने कशी याची परंपरा या संग्रहालयात अनुभवता येते. गुरव यांनी आपल्या घरासमोरील एका छोट्या खोलीत याची लक्ष्यवेधी सुरेख मांडणी केली आहे. नजर टाकताच ग्रामीण जीवनाचे चित्र उभा राहते.शिक्षणाचा श्रीगणेशा करणारी दगडी पाटी, आजी बाईचा बटवा, सौंदर्य खुलवणारी आइना पेटी, तांब्याची पितळी भांडी, फिरके तांबे, चिमणी दिवा, दुर्बीण, लाकडी कटवट, रवी, मुसळ, शेवयाचा पाट, रेडिओ, कंदील, दहा किलो वजनाचा लोखंडी ट्रंक, ठोक्याचे घड्याळ, पानपुडे, लोखंडी भले मोठे कुलूप यांची कुतूहलाने पाहणी करावीच लागते अशी जपणूक आणि मांडणी केली आहे. दीडशे वर्षांपूर्वीचा दोन, चार, आठ आणेचा दस्त (स्टँप)  हा लिखित ठेवा पाहता येतो. सव्वाशे वर्षापूर्वीची पंचाग, दीडशे वर्षापाठीमागची आर्थिक देवाण घेवाण नोंदीची डायरी सुस्थित असल्याचे दिसून येते. छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप यांच्या काळातील नाणी तसेच परकीय चलने आहेत. मलेशिया, थायलंड, सिंगापूर, नेपाळ आदी देशातील चलन पाहता येते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर