मुरगूडचे नगराध्यक्ष राजेखान जमादार यांना मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2019 13:32 IST2019-07-31T13:30:10+5:302019-07-31T13:32:26+5:30
मुरगूड ता.कागल येथील मंडलिक गटाचे लोकनियुक्त नगराध्यक्ष राजेखान जमादार यांना जबर मारहाण करण्यात आली.

मुरगूडचे नगराध्यक्ष राजेखान जमादार यांना मारहाण
मुरगूड : मुरगूड ता.कागल येथील मंडलिक गटाचे लोकनियुक्त नगराध्यक्ष राजेखान जमादार यांना जबर मारहाण करण्यात आली.
आज मुरगूड नगरपरिषेदेची जनरल सभा पालिकेत बोलवण्यात आली होती. सभा चालू झालेनंतर काही प्रश्नावर नगरसेवकांत मतभेद झाले त्यानंतर उपनगराध्यक्ष आणि त्यांच्या नगरसेवकांनी सभा त्याग केला. त्यानंतर नगराध्यक्ष राजेखान जमादार हे सभा आटपून बाहेर जात असताना त्यांना काही महिला नगरसेवकांनी अडवून प्रश्न विचारत होते.
त्यावेळी काही नगरसेवकांच्या समर्थकांनी त्यामध्ये हस्तक्षेप करत नगराध्यक्ष राजेखान जमादार यांना मारहाण केली. दरम्यान घटनास्थळी प्रचंड गर्दी जमली होती. मुरगूडच्या राजकीय इतिहासातील नगराध्यक्ष यांना मारहाण होण्याची ही घटना धक्कादायक आहे. शहरात याची जोरदार चर्चा सुरू आहे.