मुरगुडच्या व्यापारी पतसंस्थेस १० लाखांवर नफा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:26 IST2021-05-07T04:26:14+5:302021-05-07T04:26:14+5:30

सभापती शहा म्हणाले, ‘‘गेल्या आर्थिक वर्षामध्ये वार्षिक उलाढाल ८५ कोटी १२ लाख झाली असून, संस्थेचे खेळते भांडवल १७ कोटी ...

Murgud's Merchant Credit Union makes a profit of over Rs 10 lakh | मुरगुडच्या व्यापारी पतसंस्थेस १० लाखांवर नफा

मुरगुडच्या व्यापारी पतसंस्थेस १० लाखांवर नफा

सभापती शहा म्हणाले, ‘‘गेल्या आर्थिक वर्षामध्ये वार्षिक उलाढाल ८५ कोटी १२ लाख झाली असून, संस्थेचे खेळते भांडवल १७ कोटी ६७ लाख इतके आहे. संस्थेकडे ठेवी १४ कोटी ५४ लाख रु.असून त्यावर ११ कोटी १० लाखांचे कर्ज वितरण केलेले आहे. गत वर्षापेक्षा कर्ज वितरणामध्ये २ कोटी ६५ लाखांची वाढ झालेली आहे. एकूण कर्जापैकी सोने तारण कर्ज रु. ६ कोटी २६ लाखाचे वाटप केले आहे. संस्थेच्या विविध बँकेमध्ये ४ कोटी ४२ लाखांची सुरक्षित गुंतवणूक असून थकबाकी ० .२३ टक्के आहे. वरील नफा हा संस्थेने जवळ जवळ २६ लाख ६२ हजारच्या तरतुदी करून प्राप्त केला आहे.’’

यावेळी संस्थेचे उपसभापती प्रकाश सनगर, संचालक सात्तापा पाटील, हाजी धोंडीबा मकानदार, किरण गवाणकर, किशोर पोतदार, नामदेव पाटील, शशिकांत दरेकर, प्रदीप वेसणेकर,यशवंत परीट, संदीप कांबळे, सुरेश जाधव, महादेव तांबट, संगीता नेसरीकर, रोहिणी तांबट, कार्यलक्षी संचालक सुदर्शन हुंडेकर, शाखाधिकारी शाखा मुदाळ जयसिंग कांबळे व सर्व सेवक वर्ग उपस्थित होता.

Web Title: Murgud's Merchant Credit Union makes a profit of over Rs 10 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.