Murder of a youth at Talsande over a fence dispute | कुंपणाच्या वादातून तळसंदे येथे तरुणाचा खून 

कुंपणाच्या वादातून तळसंदे येथे तरुणाचा खून 

ठळक मुद्देकुंपणाच्या वादातून तळसंदे येथे तरुणाचा खून कुंपणाच्या शेड तोडल्याच्या कारणावरून दोन कुटुंबामध्ये वाद

नवे पारगाव : तळसंदे (ता. हातकणंगले) येथे जमिनीच्या व  घराजवळील असणाऱ्या कुंपणाच्या वादातून तरुणाचा खून झाला. अविनाश भगवान कांबळे (वय ३५ ) असे खून झालेल्या तरुणाच नाव आहे.

तळसंदे येथील भगवान सहदेव कांबळे व शिवाजी रामू कांबळे या चुलत भावांमध्ये जमिनीच्या व घराशेजारील कुंपणावरून वाद होता. गुरुवारी सकाळी कुंपणाच्या शेड तोडल्याच्या कारणा वरून  दोन्ही कुटुंबामध्ये वाद विकोपाला गेला. यात हाणामारी झाली. मारहाणीत  अविनाश चा मृत्यू झाला.

अविनाश कांबळे यांचा  वडापाव विक्रीचा व्यवसाय होता. कोडोली येथील उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी प्रशांत करिहोळी यांनी उत्तरीय तपासणी केली. अविनाशच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुली, मुलगा असा परिवार आहे. याबाबत वडगाव पोलीस ठाण्यात  ठाण्यात फिर्याद दाखल झाली असून पुढील तपास सुरू आहे.

Web Title: Murder of a youth at Talsande over a fence dispute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.