मुलीशी लग्नास विरोध केल्याच्या कारणावरून महिलेचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:24 IST2021-09-11T04:24:55+5:302021-09-11T04:24:55+5:30

पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, लता महादेव परीट या (गुरुवारी, ९) सकाळी जनावरांसाठी चारा आणण्यासाठी शेताकडे गेल्या होत्या. त्यांनी गवत ...

Murder of a woman for opposing marriage to a girl | मुलीशी लग्नास विरोध केल्याच्या कारणावरून महिलेचा खून

मुलीशी लग्नास विरोध केल्याच्या कारणावरून महिलेचा खून

पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, लता महादेव परीट या (गुरुवारी, ९) सकाळी जनावरांसाठी चारा आणण्यासाठी शेताकडे गेल्या होत्या. त्यांनी गवत कापून आपल्या दोन मुलांना घरी पाठवून दिले. व आपण गवत कापून घेऊन येत असल्याचे सांगितले. दरम्यान त्या घरी आल्या नाहीत म्हणून ग्रामस्थांसह मुलांनी शोधाशोध सुरू केली. त्यावेळी जनार्दन देसाई यांच्या गावंधर नावाच्या शेतातील ऊस पिकाच्या सरीमध्ये लता परीट यांचा मृतदेह आढळून आला होता. पोलिसांनी रात्री गुरुप्रसाद माडभगत याला ताब्यात घेतले होते. त्याच्याकडे चौकशी केली असता लता परीट यांच्या मुलीशी लग्नाची मागणी केली होती. मात्र त्यांनी या लग्नाला विरोध केल्याच्या कारणावरून मनात राग धरून लता यांच्यावर खुरप्याने तोंडावर व मानेवर वार केले व जखमी अवस्थेतच ओढत नेवून उसाच्या सरीत नेवून टाकले. तसेच मयताच्या अंगावर गवत व उसाचा पाला टाकून तो घरी आला होता.

उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील हारुगडे, पोलीस उपनिरीक्षक युवराज जाधव, शिवाजी बामणे, दत्ता शिंदे, संदीप म्हसवेकर, विशाल कांबळे, अनिल तराळ, रेश्मा नाईक, कविता कदम व स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने ११ तासांत खुनाचा गुन्हा उघडकीस आणला आहे. आज आरोपी गुरुप्रसाद माडभगत याला आजऱ्यातील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर उभे केले असता पाच दिवस पोलिस कस्टडी देण्यात आली आहे. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक सुनील हरुगडे करीत आहेत.

फोटो ओळी : आल्याचीवाडी (ता. आजरा) येथील महिलेचा खून करणाऱ्या गुरुप्रसाद माडभगत याच्यासोबत तपास अधिकारी सुनील हारुगुडे, युवराज जाधव, दत्ता शिंदे, संदीप म्हसवेकर, अनिल तराळ.

क्रमांक : १००९२०२१-गड-०७

गुरूप्रसाद माडभगत : १००९२०२१-गड-०६

Web Title: Murder of a woman for opposing marriage to a girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.