कोल्हापूरमध्ये महिलेचा खून, तरुण ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2017 18:54 IST2017-09-06T18:49:40+5:302017-09-06T18:54:51+5:30
कोल्हापूरमध्ये प्रतिभानगर येथे फलॅटमध्ये एकट्या असलेल्या महिलेचा चाकुने गळा चिरुन खून केल्याची घटना घडली. पुजा रमेश महाडीक (वय ३८) असे महिलेचे नाव आहे.

कोल्हापूरमध्ये महिलेचा खून, तरुण ताब्यात
कोल्हापूर : प्रतिभानगर येथे फलॅटमध्ये एकट्या असलेल्या महिलेचा चाकुने गळा चिरुन खून केल्याची घटना घडली. पुजा रमेश महाडीक (वय ३८) असे महिलेचे नाव आहे.
याप्रकरणी राजारामपूरी पोलीसांनी संशयित आरोपी अफताब इब्राहीम शरकवास (रा. प्रतिभानगर) याला ताब्यात घेतले आहे. दोघांचे एकाच अपार्टमेंन्टमध्ये शेजारी फलॅट आहेत.
पुजा महाडीक यांचे पती कामावर गेले होते. त्यांची साडेचार वर्षाची मुलगी व त्या अशा दोघीच घरी असल्याचे पाहून संशयिताने खून केल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले आहे.
खूनामागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. संशयिताने महिलेचे आपल्या मोबाईलमध्ये फोटो काढून घरात घुसून अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा घटनास्थळी आहे.