मर्डरचा स्टेटस ठेवणाऱ्याला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:21 IST2020-12-24T04:21:08+5:302020-12-24T04:21:08+5:30
इचलकरंजी : दीपक कोळेकर खून प्रकरणातील संशयित आरोपीने दहशत माजविण्याच्या उद्देशाने सोशल मीडियावर ‘मर्डरला वर्ष पूर्ण. दुसऱ्या वादाची ...

मर्डरचा स्टेटस ठेवणाऱ्याला अटक
इचलकरंजी : दीपक कोळेकर खून प्रकरणातील संशयित आरोपीने दहशत माजविण्याच्या उद्देशाने सोशल मीडियावर ‘मर्डरला वर्ष पूर्ण. दुसऱ्या वादाची तयारी सुरू’ अशा आशयाचा व्हिडीओ स्टेटसला ठेवला होता. आकाश संजय वासुदेव (वय २७, रा. भोनेमाळ) असे त्याचे नाव आहे. त्याला शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली.
येथील ईदगाह मैदानाजवळ पूर्ववैमनस्यातून १० डिसेंबर २०१९ ला दीपक महादेव कोळेकर (२६) याचा निर्घृणपणे खून करण्यात आला होता. या प्रकरणात आकाश याच्यासह अक्षय नरळे, मेहबूब उकले, आदिनाथ बावणे, सुनील वाघवे, कासिम नदाफ व सागर आंबले या सातजणांना अटक करण्यात आली होती.
दरम्यान, हे सर्वजण सध्या जामिनावर बाहेर आहेत. यातील आकाश याने वर्षपूर्तीसंदर्भातील व्हिडीओ तयार करून सोशल मीडियावर स्टेटसला ठेवला होता. ही माहिती पोलीस उपअधीक्षक बाबूराव महामुनी यांना सोमवारी (दि.२१) समजली. त्यांनी शिवाजीनगर पोलिसांच्या पथकामार्फत सोमवारी रात्रीच त्याला अटक केली. मंगळवारी येथील न्यायालयासमोर हजर केले असता त्याची १५ दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.