शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

भाच्याला वाचवण्यास गेलेल्या मामाचा खून, चौघाना अटक; जमिनीच्या मोबदल्याच्या वाटणीवरून वाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2022 14:05 IST

शासनाकडून भूसंपादन केलेल्या जमिनीच्या मिळालेल्या मोबदल्यातील वाटणीवरुन झालेल्या मारहाणीत भाच्याला वाचविण्यास गेलेल्या मामाचा खून झाला आहे.

देवाळे : पन्हाळा तालुक्यातील आवळी पैकी पोवारवाडी येथे शासनाकडून भूसंपादन केलेल्या जमिनीच्या मिळालेल्या मोबदल्यातील वाटणीवरुन वादातून झालेल्या मारहाणीत भाच्याला वाचविण्यास गेलेल्या मामाचा रविवारी रात्री उशिरा खून झाला. रघुनाथ ज्ञानू पोवार (वय ७०, आवळी पैकी पोवारवाडी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.या प्रकरणी कोडोली पोलिसात  गुन्ह्याची फिर्याद जखमी भगवान महादेव पाटील (रा. आवळी पैकी पोवारवाडी) यांनी दिली. पोलिसानी संशयित आरोपी प्रविण सुभाष पाटील, प्रदीप विश्वास पाटील, विश्वास बाबुराव पाटील (तिघे, रा. आवळी पैकी पोवारवाडी) आणि दिलीप शामराव गराडे (रा. पैजारवाडी) ता. पन्हाळा यांना पोलीसांनी अटक केली. खून झालेल्या मामाचे संशयित आरोपी हे देखील भाचेच आहेत.याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, भगवान पाटील आणि संशयित आरोपी प्रविण, प्रदीप  आणि विश्वास पाटील हे एकाच गावातील असून एकमेकाच्या घरासमोर राहतात. यांच्यामध्ये गट नंबर ७४१ (अ) मधील कोल्हापूर –रत्नागिरी रोडसाठी भुसंपादित जमिनीला शासनाकडून मिळालेल्या पैशाच्या वाटणीवरुन गेले पंधरा दिवसापासून वाद सुरु होता.काल, रविवारी भगवान पाटील हे रात्री साडेनऊच्या सुमारास घराचे दारात हातपाय धुत असताना संशयित आरोपी प्रविण पाटील याने शिवीगाळ करुन भगवान पाटील यांना काठीने मारहाण केली. हा वाद ऐकून त्यांची पत्नी व मामा रघुनाथ ज्ञानु पोवार भांडण सोडविण्यासाठी गेले असता सर्व संशयित आरोपींनी रघुनाथ पोवार यांना लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली. यामध्ये रघुनाथ यांचा जागीच मृत्यू झाला.संशयितांनी घराचा दरवाजा तोडून घरात बसलेला मुलगा प्रतिक याला दगडाने मारहाण करुन दहशत माजवली. या घटनेनंतर जखमी भगवान पाटील यांनी कोडोली पाटील ठाण्यात फिर्याद दिली. सहायक पोलीस निरीक्षक शितलकुमार डोईजड यांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा करुन संशयित आरोपींना अटक केली. आज सोमवारी दुपारी त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारी