शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: घोडागाडी शर्यतीच्या वादातून इचलकरंजीत युवकाचा निर्घृण खून, तिघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2024 14:12 IST

मजुरी करून संसाराचा गाडा चालविणाऱ्या कुटुंबातील हाताला आलेला मुलगा गेल्याने त्याच्या आईचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा

इचलकरंजी : घोडागाडी शर्यतीच्या वादातून शहापूर येथील शाळेच्या पाठीमागे एका युवकाचा डोक्यात दगड घालून खून करण्यात आला. सुशांत दीपक कांबळे (वय १८, रा. आसरानगर, इचलकरंजी) असे त्याचे नाव आहे. मध्यरात्रीच्या सुमारास घडलेली ही घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी गतीने तपास करत तिघा संशयितांना अटक केली. या घटनेची नोंद शहापूर पोलिस ठाण्यात झाली आहे.अतिश दत्तात्रय नेटके (१९, रा. सहकारनगर), आर्यन सरदार चव्हाण (२१, रा. गणेशनगर) व प्रदीप पारद यादव (२०, रा. जेकेनगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. शहापुरातील विद्यामंदिर क्र. ४३ या शाळेच्या मागे गुरुवारी सकाळी व्यायामासाठी आलेल्या नागरिकांना मृतदेह आढळला. त्यांनी ही माहिती पोलिसांना दिली. पोलिस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांच्यासह पथकाने घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता तोंडावर, छातीवर व पाठीत धारदार शस्त्राने वार करून युवकाचा खून केल्याचे आढळले.पोलिसांना घटनास्थळी सापडलेल्या मोबाइलवरून मृताची ओळख पटली. पंचनामा करून मृतदेह विच्छेदनासाठी आयजीएम रुग्णालयात हलविला. त्यानंतर शहापूर पोलिस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर (एलसीबी)च्या पथकाने मारेकऱ्यांचा शोध सुरू केला. तपासामध्ये मोबाइल लोकेशनवरून संशयित कोल्हापुरातील राजाराम कॉलेजच्या इमारतीच्या मागील बाजूस असल्याचे समजले. त्यानुसार कारवाई करत संयुक्त पथकाने तिघा संशयितांना ताब्यात घेतले.त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता अतिश व सुशांत हे एकमेकांचे मित्र होते. सुशांत हा एका मित्राच्या वाढदिवसासाठी जातो म्हणून सांगून बुधवारी (दि. ३) सायंकाळी घरातून बाहेर पडला होता. मात्र, वाढदिवस नसून तो संशयितांसोबत दारू पिण्यासाठी गेला होता. दारू पिऊन हे सर्व जण मोटारसायकलवरून शाळेजवळ आले. काही दिवसांपूर्वी त्यांच्यात घोडागाडी शर्यतीच्या कारणावरून झालेला वाद तेथे पुन्हा उफाळून आला. त्यातून हा खून केला असल्याचे संशयितांनी कबूल केले. घटनास्थळी व आयजीएम रुग्णालय परिसरात गर्दी झाली होती.आईला भोवळमजुरी करून संसाराचा गाडा चालविणाऱ्या कुटुंबातील हाताला आलेला मुलगा गेल्याने त्याच्या आईचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. त्यात आईला दोनवेळा भोवळही आली होती. सुशांतच्या पश्चात आई आणि एक मोठा भाऊ असा परिवार आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरichalkaranji-acइचलकरंजीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस