शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur crime: इचलकरंजीच्या तरुणाचा निर्घृण खून, हल्लेखोर पसार; कारण अस्पष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2023 14:26 IST

वादावादीतून हल्लेखोरांनी केले धारदार शस्त्राने वार

इचलकरंजी : यड्राव (ता शिरोळ) येथील फाट्यावर एका पानपट्टी चालक तरुणाचा मंगळवारी रात्री धारदार शस्त्राने वार करून निर्घुन खून करण्यात आला. तेजस विजय डांगरे ( वय 22, रा अण्णा रामगोंडा शाळेजवळ इचलकरंजी ) असे त्याचे नाव आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत शहापूर पोलीस ठाण्यात सुरू होते.याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, तेजस हा पानपट्टी चालक असून. यड्राव फाट्यावर त्याची पानपट्टी आहे. मंगळवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास पानपट्टी बंद करून तो मित्रांसोबत यात्रेत जेवायला जाण्यासाठी थांबला होता. त्यावेळी हल्लेखोरांनी त्याला बाजूला असलेल्या वडा सेंटर जवळ बोलावून घेतले. तेथे त्यांच्यात वादावादी सुरु झाली. त्यातून हल्लेखोर त्याच्यावर धारदार शस्त्राने वार करून निघून गेले. त्यावेळी तेथे जमलेल्यानी त्याला तातडीने आयजीएम रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तो मृत झाल्याचे घोषित केले. आयजीएम रुग्णालय परिसरात मित्र व नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती. नातेवाईक मोठमोठ्याने आक्रोश करत होते. घटनेनंतर संशयावरून तणाव वाढत असल्याने पोलिसांनी आयजीएम रुग्णालय, लिंबू चौक व शहापूर चौक येथे बंदोबस्त तैनात केला होता.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस