शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: शियेत बालिकेचा खून: पोलिस दलातील बेली श्वानाने अवघ्या दहा मिनिटांत शोधला मृतदेह

By उद्धव गोडसे | Updated: August 23, 2024 14:15 IST

पोलिस अधीक्षकांकडून श्वान पथकाचे कौतुक, बेलीने आजवर खुनाच्या तीन गुन्ह्यांची केली उकल

उद्धव गोडसेकोल्हापूर : पीडित मुलगी बेपत्ता झाल्यापासून १५ तास स्थानिक नागरिक आणि पोलिसांकडून तिचा शोध सुरू होता. रात्रभर परिसर पालथा घालूनही तिचा शोध लागत नव्हता. मात्र, गुरुवारी (दि. २२) दुपारी श्वानपथक पोहोचल्यानंतर अवघ्या दहा मिनिटांत बेली नावाच्या श्वानाने मृतदेहाचा छडा लावला. यामुळे गुन्हा उघडकीस आला आणि संशयित आरोपीचा शोध घेण्यात पोलिसांना मोलाची मदत झाली.

गुरुवारी सकाळी सव्वाअकराच्या सुमारास श्वान पथकाचे प्रमुख पोलिस हवालदार प्रदीप माने यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या अधिका-यांचा कॉल आला. तातडीने श्वान पथकासह शिये येथे पोहोचण्याचा आदेश मिळताच बेली श्वानासह हवालदार माने, प्रदीप सुर्वे, कॉन्स्टेबल कुणाल झेंडे आणि चालक राजू नाईक घटनास्थळी पोहोचले. पावणेबाराला घटनास्थळी पोहोचल्यानंतर श्वान पथकातील कर्मचा-यांनी परिस्थितीचा अंदाज घेतला.काही मिनिटांत बेली श्वानाला वाहनातून उतरवून पीडित मुलीच्या घरात घेऊन गेले. मुलीच्या कपड्यांचा वास देताच बेली श्वान घरापासून दक्षिणेच्या दिशेने निघाले. उसाच्या शेतातून सुमारे ८०० मीटर अंतरावर असलेल्या ओढ्याच्या काठावर पोहोचताच तिने भुंकून इशारा केला. पोलिसांनी ओढ्यात पाहताच पीडित मुलीचा मृतदेह आढळला. अवघ्या दहा मिनिटांत श्वानाने मृतदेहाचा शोध घेऊन आपले काम फत्ते केले.

बेलीने केला तीन खुनांचा उलगडाकोल्हापूर पोलिस दलाकडील श्वान पथकात गेल्या चार वर्षांपासून बेल्जियम शेफर्ड जातीची बेली नावाची मादी श्वान कार्यरत आहे. चंदीगड येथे एक वर्षाचे प्रशिक्षण पूर्ण करून ती कोल्हापूर पोलिस दलात दाखल झाली. तिचे वय पाच वर्षांचे आहे. गंभीर गुन्ह्यांचा उलगडा करण्याची तिची खासियत आहे. पेठ वडगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत शेतातील महिलेचा मृतदेह, शाहूवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत सावत्र बापाने केलेला मुलाचा खून आणि शिये येथील बालिकेच्या खुनाचा उलगडा करण्याचे काम तिने केले आहे. तसेच अनेक घरफोडीच्या गुन्ह्यांचा तपास करण्यात तिने पोलिसांना मदत केली.उल्लेखनीय कामगंभीर गुन्ह्याचा उलगडा करण्यात बेली श्वानाने पोलिसांना मोलाची मदत केली. याबद्दल पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी श्वान पथकाचे विशेष कौतुक केले. या पथकातील प्रमुख प्रदीप माने यांच्यासह कर्मचारी प्रदीप सुर्वे, कुणाल झेंडे, राजू नाईक, अरुण पाटील, राजू डाके, अनिल धणे, दीपक अष्टेकर, भगवान जाधव, पृथ्वीराज निंबाळकर आणि राहुल माळी हे या पथकात कार्यरत असतात.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसdogकुत्रा